शारजा : आयर्लंडचा आठ गडी आणि नऊ चेंडू राखून धुव्वा उडवत नामिबिया संघाने शुक्रवारी पहिल्याच ट्वेन्टी-२० विश्वचषकात ‘अव्वल-१२’ फेरी गाठण्याचा पराक्रम केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डावखुरा गोलंदाज जॅन फ्रॅलिंकच्या (३/२१) भेदक माऱ्यामुळे आयर्लंडला ८ बाद १२५ धावांपर्यंतच जेमतेम मजल मारता आली. त्यानंतर कर्णधार जेरार्ड इरास्मस (नाबाद ५३ धावा) आणि डेव्हिड वीज (नाबाद २८) यांच्या योगदानामुळे नामिबियाने आयर्लंडने दिलेले १२६ धावांचे लक्ष्य १८.३ षटकांत गाठले. त्यामुळे श्रीलंकेसह नामिबियाने ‘अ’ गटातून आगेकूच केली असून आता अव्वल-१२ फेरीत ते भारताचा समावेश असलेल्या दुसऱ्या गटातून खेळतील. आयर्लंड आणि नेदरलँड्स या संघांना मात्र प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namibia for the first time in the top12 round akp
First published on: 23-10-2021 at 00:15 IST