पीटीआय, जकार्ता

कनिष्ठ गटातील जागतिक विजेत्या नॅन्सीने आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत बुधवारी वरिष्ठ गटात १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. त्याच वेळी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा अनुभव असलेली एलाव्हेनिल व्हलारिवन रौप्यपदकाची मानकरी ठरली.

Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत

कनिष्ठ गटात जागतिक सांघिक विजेती असलेल्या युवा नॅन्सीने सर्वोत्तम २५२.८ गुणांची कमाई करताना सुवर्णयश मिळवले. एलाव्हेलिनचे सुवर्णपदक अवघ्या दशांश गुणाने हुकले. तिने २५२.७ गुणांसह रौप्यपदक मिळवले. या स्पर्धा प्रकारातील भारताचे निर्विवाद वर्चस्वही थोडक्यात हुकले. तिसरी स्पर्धक मेहुली घोषला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीनची शेन युफान कांस्यपदकाची मानकरी ठरली.

हेही वाचा >>>IND vs ENG : दिनेश कार्तिकला इंग्लंडच्या कोचिंग स्टाफमध्ये मिळाली महत्त्वाची जबाबदारी, ‘इतक्या’ दिवसांचा केला करार

एलाव्हेनिल ६३३.८ अशा सर्वाधिक गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. नॅन्सीने ६३२.४, तर मेहुलीने ६३१.० गुणांची कमाई करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत मात्र नॅन्सीची अचूकता अधिक होती. अखेरच्या संधीपर्यंत बरोबरीत असलेल्या एलाव्हेनिलला त्या संधीला ९.७ गुणांचाच वेध घेता आला. तुलनेत नॅन्सीने अचूक लक्ष्यभेद करताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

ऑलिम्पिकसाठी यापूर्वीच पात्र ठरलेल्या ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रुद्रांक्षने २२८.७ गुणांसह हे पदक मिळवले. चीनच्या मा सिहानने (२५१.४) सुवर्ण, तर कोरियाच्या दाएहन चोएने रौप्यपदक पटकावले. भारताच्या अर्जुन बबुतानेही अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत रुद्रांक्ष तिसऱ्या, तर बबुता चौथ्या क्रमांकावर होता. त्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठता आली.

(नॅन्सी)