पुणे : महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करताना वरिष्ठ राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. महिला विभागातून आकर्षि काश्यप, अस्मिता चलिहा, आदिती राव आणि अनुपमा उपाध्याय यांनी उपांत्य फेरी गाठली.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीने आपली आगेकूच कायम राखली. ताकदवान आणि नियंत्रित फटक्यांच्या जोरावर हर्षिलने यश योगीचे आव्हान २१-१०, २१-५ असे ३० मिनिटांत संपुष्टात आणले. हर्षिलने कमालीच्या आत्मविश्वासाने खेळ करताना लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. २-२ अशा बरोबरीनंतर पहिल्या गेममध्ये हर्षिलने ६-३ अशा स्थितीत सलग ८ गुणांची कमाई करताना १४-६ अशी मोठी आघाडी घेतली आणि तीच कायम राखत मोठय़ा फरकाने पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेमलाही हर्षिलचे वर्चस्व होते. गेमच्या उत्तरार्धातील १२-१२ अशी बरोबरी वगळता हर्षिल यशचा सामना करू शकला नाही. या एकमेव बरोबरीनंतर हर्षिलने यशला केवळ तीनच गुण मिळू दिले. उपांत्य फेरीत हर्षिलसमोर प्रियांशू राजावतचे आव्हान असेल.
पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित श्रीकांतने कार्तिकेय गुलशन कुमारचे आव्हान २१-१०, २१-१८, २१-१६ असे मोडून काढले. ही लढत ५९ मिनिटे चालली. श्रीकांतची गाठ एम. मिथुनशी पडणार आहे. एम. मिथुनने अनुभवी सौरभ वर्माचे आव्हान १५-२१, २१-१९, २१-१९ असे मोडून काढले.
’ निकाल उपांत्यपूर्व फेरी
’ महिला : आकर्षि काश्यप वि.वि. देविका सिहाग १९-२१, २१-१३, २१-१३, अस्मिता चलिहा वि.वि. इर्षांणी बरुआ २१-१०, २१-२३, २१-१६, आदिती राव वि.वि. ईरा शर्मा २१-१६, २१-१५, अनुपमा उपाध्याय वि.वि. श्रीयांशी वालीशेट्टी २१-०, १६-२१, २१-१९
’ पुरुष : हर्षिल दाणी वि.वि. यश योगी २१-१०, २१-१५, प्रियांशू राजावत वि.वि. किरण जॉर्ज
२१-१४, २१-१५, किदम्बी श्रीकांत वि.वि. कार्तिकेय गुलशन कुमार २१-१०, २१-१८,
२१-१६, एम. मिथुन वि.वि. सौरभ वर्मा १५-२१, २१-१९, २१-१९