टी-२० मालिकेत ०-५ ने पराभव स्विकारल्यानंतर न्यूझीलंड संघाने वन-डे मालिकेत दमदार पुनरागमन केलं. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने ०-२ ने विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वन-डे सामन्यात बाजी मारल्यानंतरही न्यूझीलंड संघाला ICC ने दंड ठोठावला आहे. षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी सामनाधीकारी ख्रिस ब्रॉड यांनी न्यूझीलंडच्या मानधनातून ६० टक्के रक्कम कापून घेतली आहे. ICC ने प्रसिद्धीपत्रक काढत यासंदर्भात माहिती दिली.

अवश्य वाचा – न्यूझीलंडने रोखला भारताचा अश्वमेध, विराटसेनेने वन-डे मालिका गमावली

सामनाधिकारी आणि दोन पंचासमोर झालेल्या सुनावणीत न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने आपली चूक मान्य केली. याआधी भारतीय संघालाही न्यूझीलंड दौऱ्यात सलग ३ सामन्यांत षटकांची गती कायम न राखल्यामुळे दंडाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान वन-डे मालिकेत व्हाईटवॉश टाळण्यासाठी भारताला अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. मंगळवारी अखेरचा वन-डे सामना खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – भारतीय संघाला जाणवतेय रोहित शर्माची उणीव, आकडेवारी पाहा तुम्हालाही पटेल