New Zealand beat England by one run: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला. किवी संघाने या सामन्यात अवघ्या एका धावेने शानदार विजय मिळवला. या सामन्यात कधी इंग्लंड तर कधी न्यूझीलंडचा वरचड दिसत होते. कधी इंग्लंड संघ सामना सहज जिंकेल असे वाटत असताना न्यूझीलंडने विजय मिळवला. विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंने एकच जल्लोष केला, जो जेम्स अँडरसनही पाहतच राहिला.

वास्तविक, इंग्लंड संघाची शेवटची जोडी मैदानात होती. इंग्लिश संघाला विजयासाठी फक्त ७ धावा करायच्या होत्या. जेम्स अँडरसनने जॅक लीचला साथ दिली. या ७ धावांपैकी एक धाव जॅक लीचने काढली आणि जेम्स अँडरसनच्या बॅटमधून एक चौकार आला. अशा स्थितीत इंग्लंडचा संघ हा सामना जिंकेल असे मानले जात होते, पण किवी संघ हार मानत नव्हता.

न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊथी स्वत: गोलंदाजीची कमान सांभाळत होता. नील वॅगनर दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करत होता. विजयासाठी दोन धावांची गरज असताना, वॅगनरच्या शेवटच्या षटकात चौकार मारणाऱ्या वॅगनरसमोर अँडरसन होता.

टीम साऊथीचे पुढचे षटक जॅक लीचविरुद्ध मेडन गेले होते आणि नील वॅगनर समोर अँडरसन होता. त्याने पहिला चेंडू विकेटच्या मागे जाऊ दिला. चेंडू उंचीने वाइड दिसत होता, पण अँडरसनची उंची पाहून अंपायरने त्याला बाउन्सर दिला. वॅग्नरने पुढचा चेंडू ऑनसाईड टाकला, ज्यावर अँडरसनला एक-दोन धावा काढायच्या होत्या, पण चेंडूने बॅटची कडा घेतली आणि विकेटच्या टॉम ब्लंडेलच्या हाती झेलबाद झाला. यानंतर किवी संघाचा आनंद पाहण्यासारखा होता.

हेही वाचा – IND vs AUS: टीम इंडियासाठी Virat Kohli बनला फिल्डिंग कोच; खेळांडूकडून करवून घेतला क्षेत्ररक्षणाचा सराव, पाहा मजेदार VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे तर, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ८ बाद ४३५ धावा केल्या होत्या. यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव २०९ धावांत गुंडाळला गेला. इथे बेन स्टोक्सने दुसरी आणि सर्वात मोठी चूक केली. २२६ धावांची आघाडी घेऊन स्टोक्सने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाज आधीच थकले होते, त्यामुळे किवी फलंदाजांनी याचा फायदा घेत दुसऱ्या डावात ४८३ धावांची मजल मारली. त्यानंतर न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु दुसऱ्या डावात संपूर्ण इंग्लिश संघ २५६ धावांवर गारद झाला.