Border Gavaskar Trophy: इंदोरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून (बुधवार) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या या तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाने जोरदार सराव केला आहे. जेणेकरून आधीच २-० अशी आघाडी घेतलेला भारतीय संघ या सामन्यात मालिका शेवटपर्यंत नेऊ शकेल. दरम्यान विराट कोहलीने संघाचा क्षेत्ररक्षण सराव करुन घेतला, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

विराट कोहली सध्या टीम इंडियाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. या तंदुरुस्त खेळाडूने इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सराव करताना काही काळ भारतीय खेळाडूंना झेल घेण्याचा सराव करुन घेतला. विराट कोहली बॅटसह मध्यभागी बसलेला दिसला आणि थ्रोडाउनवर खेळाडूंकडून कॅचचा सराव करवून घेताना दिसला.

यादरम्यान विराट कोहलीनेही खूप धमाल केली आणि इतर खेळाडूही त्याला साथ देताना दिसले. विराट कोहलीकडून कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ कोणतीही मोठी खेळी झालेली नाही. सध्याच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या कसोटी सामन्यात तो एका डावात १२ धावा करून बाद झाला होता. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ४४ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने २० धावा केल्या.

दुसरीकडे इंदूरच्या होळकर स्टेडियमवर टीम इंडियाचे दोन फलंदाज एकत्र सराव करताना दिसले. लोकांसाठी हे एक मनोरंजक दृश्य होते. कारण हे दोन फलंदाज शुभमन गिल आणि फॉर्म ऑफ फॉर्म केएल राहुल होते, या दोन्ही खेळाडूंपैकी एकाला सलामीवीर म्हणून इलेव्हनमध्ये स्थान मिळेल.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२३ मधील स्थिती –

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसरा सामना दिल्लीमध्ये खेळला गेला. या सामन्यात देखील भारताने ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्सने विजय मिळावला. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदूर आणि चौथा सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.

हेही वाचा – ENG vs NZ 2nd Test: विजयी रथाला लाजिरवाण्या पराभवाने ब्रेक लागल्याने Ben Stokes ची आली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्हाला…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.