अझलन हॉकी चषक स्पध्रेत भारतीय संघाने निक्कीन थिमय्या याच्या हॅट्ट्रिकच्या बळावर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर ४-२ असा सनसनाटी विजय मिळवला. भारताने या विजयाबरोबरच तिसऱ्या क्रमांकासाठी होणाऱ्या लढतीत स्थान मिळविले.
व्ही. आर. रघुनाथ याने पहिल्याच मिनिटाला भारताचे खाते उघडून कांगारूंना धोक्याचा इशारा दिला. थिमय्या याने २३व्या, ३२व्या व ६०व्या मिनिटाला गोल करीत संघास महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल बिएल (१४ वे मिनिट) व मॅट गोहदेस (५३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. साखळी गटातील भारताचा हा शेवटचा सामना होता. त्यांनी
पाच सामन्यांमध्ये सात गुणांची कमाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2015 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियाला भारताचा धक्का
अझलन हॉकी चषक स्पध्रेत भारतीय संघाने निक्कीन थिमय्या याच्या हॅट्ट्रिकच्या बळावर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर ४-२ असा सनसनाटी विजय मिळवला.
First published on: 12-04-2015 at 03:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nikkin thimmaiah scores hat trick as india stun australia 4 2 in azlan shah cup