Novak Djokovic French Open: फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविचने चौथ्या क्रमांकाच्या रुडचा सलग तीन सेटमध्ये पराभव केला. त्याने हा सामना ७-६ (७-१), ६-३, ७-५ असा जिंकला. सर्बियन खेळाडूने फ्रेंच ओपन जिंकून इतिहास रचला. तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू ठरला. जोकोविचच्या नावावर २३ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. यात त्याने स्पेनच्या राफेर नदालला (२२) मागे टाकले. स्वित्झर्लंडचा निवृत्त महान खेळाडू रॉजर फेडरर २० वेळा चॅम्पियन बनला.

३६ वर्षीय जोकोविचने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकली आहे. प्रत्येकी किमान तीन वेळा चार ग्रँडस्लॅम जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. दुसरीकडे, पराभवानंतर कॅस्पर रुडला आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत तो दुसऱ्यांदा पराभूत झाला आहे. याशिवाय यूएस ओपनच्या अंतिम फेरीतही तो एकदा पराभूत झाला आहे.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

नदालने जोकोविचचे अभिनंदन केले

जोकोविचच्या विजयानंतर नदालने त्याचे अभिनंदन केले. त्याने ट्वीटमध्ये एक खास संदेश लिहिला आहे की, “या अविश्वसनीय कामगिरीबद्दल नोव्हाक जोकोविचचे खूप खूप अभिनंदन. २३ ही अशी संख्या आहे ज्याचा काही वर्षांपूर्वी कोणी विचार करणेही अशक्य होते आणि तुम्ही ते घडवून आणले. या विजयाचा आपल्या कुटुंबासह आणि संघातील सहकाऱ्यांच्या समवेत आनंद घ्या. तुला पुढील खेळासाठी खूप खूप शुभेच्छा!”

पहिल्या सेटमध्ये चुरशीची लढत झाली

फ्रेंच ओपन फायनल सामन्याची छान सुरुवात झाली, कॅस्पर रुडने जोकोविचला चांगलीच टक्कर दिली. दोन्ही खेळाडूंनसमोर विजयाचे खडतर आव्हान होते त्यांनी या सामन्यात कडवी झुंज दिली. पहिला सेट ८१ मिनिटे चालला, जोकोविचने टायब्रेकरमध्ये ७-६ (७-१) असा विजय मिळवला. कॅस्पर रुडन एका टप्प्यावर ३-०ने आघाडीवर होता परंतु २३ ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाकने आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून पहिल्या सेटमध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला.

दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये रुड घसरला

जोकोविच आणि रुड यांच्यातील दुसरा सेट खूपच सोपा होता. यामध्ये कॅस्पर रुड चांगली लढत देऊ शकला नाही. त्याचा जोकोविचने ६-३ असा सहज पराभव केला. जोकोविच सेट संपवण्याच्या घाईत होता असे दिसत होते. त्याने दुसऱ्या सेटमध्ये रुडचा वाईट पद्धतीने पराभव केला. यानंतर तिसर्‍या सेटमध्ये रुडने आपल्या खेळात थोडी सुधारणा केली, पण तो सामना चौथ्या सेटमध्ये घेऊन जाण्यात अपयशी ठरला. तिसऱ्या सेटमध्ये त्याने थोडक्यात आघाडी घेतली, पण जोकोविचवर मात करू शकला नाही आणि ७-५ असा पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा: WTC 2023 Final fact check: टीम इंडियाच्या पराभवानंतर रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली? ट्वीट व्हायरल; नेमकं काय आहे सत्य? जाणून घ्या

फुटबॉल दिग्गज सामना पाहण्यासाठी आले होते

जोकोविच आणि रुड यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी फुटबॉल दिग्गजांनीही हजेरी लावली. फ्रेंच स्टार खेळाडू कायलियन एम्बाप्पे स्टेडियममध्ये दिसला. त्याचवेळी हा सामना पाहण्यासाठी स्वीडनचा महान फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचही पोहोचला आहे. दोन्ही खेळाडू फ्रान्समधील पॅरिस सेंट-जर्मेनकडून क्लब स्तरावर खेळले आहेत. एमबाप्पे आणि इब्राहिमोविच यांनी हस्तांदोलन केले. इब्राहिमोविचने नुकतीच फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. या दोन खेळाडूंशिवाय फ्रान्सचा ऑलिव्हर गिरौडही दिसला.