ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. फॉर्मात असलेला सलामीवीर क्विंटन डी कॉकला संधी देण्यात आली आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून सावरणाऱ्या जेपी डय़ुमिनीला समाविष्ट करण्यात आले आहे. फिरकीपटू रॉबिन पीटरसनला डच्चू देण्यात आला असून, इम्रान ताहीर आणि आरोन फँगिसो यांची निवड करण्यात आली
आहे.
  संघ : ए बी डी व्हिलियर्स (कर्णधार), हशिम अमला, कायले अ‍ॅबॉट, फरहान बेहारडिन, क्विंटन डी कॉक, जे.पी.डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रन ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वेन पार्नेल, आरोन फँगिसो, व्हेरनॉन फिलँडर, रिली रोसोऊव आणि डेल स्टेन.