धरमशाला : बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे धक्कादायक निकाल नोंदवण्यात सक्षम असलेले संघ आज, शनिवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आमनेसामने येणार आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान यांच्यातील द्वंद्वावर चाहत्यांचे लक्ष असेल.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या संघाने प्रतिस्पध्र्याना नेहमीच आव्हान दिले आहे. तुलनेने अफगाणिस्तानचा संघ उशिराने उदयास आला असला, तरी त्यांना कमी लेखण्याची चूक अन्य संघ करणार नाहीत. सध्याच्या घडीला बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे तुल्यबळ संघ दिसतात.

AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins' Hand
AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
AUS vs PAK Match Updates Australia vs Pakistan 1st ODI
AUS vs PAK : पाकिस्तानची झुंज अपयशी, अखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत मिळवला रोमहर्षक विजय
The New Zealand team defeated the Indian team in the test match sport news
सपशेल अपयशाची नामुष्की; फिरकीपुढे भारताची पुन्हा दाणादाण
Ball tampering by India A players during the match against Australia A test match sports
भारत ‘अ’ संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचे आरोप!
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ India Lost 3 Wickets in Just 9 Balls Yashasvi Jaiswal Bowled Virat Kohli Suicidal Run Out on Day 1 of Mumbai test
IND vs NZ: ९ चेंडूत ३ विकेट्स आणि टीम इंडियाची हाराकिरी, रोहित-विराटने पुन्हा केलं निराश

हेही वाचा >>>ENG vs NZ: इंग्लंडच्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवागने घेतला यू-टर्न; म्हणाला, “आता माझी भविष्यवाणी…”

विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी शाकिब आणि तमिम इक्बाल या बांगलादेशच्या आजी-माजी कर्णधारांमधील वादाची बरीच चर्चा झाली. मात्र, आता हा वाद मागे टाकत क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा बांगलादेश संघाचा प्रयत्न असेल.

अफगाणिस्तान

’ फिरकी गोलंदाजी ही अफगाणिस्तानची जमेची बाजू आहे. त्यांच्याकडे रशीद खान, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद यांसारखे प्रतिभावान फिरकी गोलंदाज आहेत.

’अफगाणिस्तानच्या फलंदाजीची भिस्त रहमनुल्ला गुरबाझ, कर्णधार हशमतुल्ला शाहिदी, इब्राहिम झादरान, रहमन शाह यांच्यावर असेल. अखेरच्या षटकांत नबीची कामगिरीही महत्त्वाची ठरेल.

हेही वाचा >>>PAK vs NED: पाकिस्तानने विश्वचषकाची विजयाने केली सुरुवात, पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सचा ८१ धावांनी उडवला धुव्वा

बांगलादेश

’शाकिबची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना केली जाते. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत शाकिबला योगदान द्यावे लागेल.

’ बांगलादेशकडे गुणवान गोलंदाज आहेत. गोलंदाजीत शाकिबला मुस्तफिझूर रहमान, तस्किन अहमद, शोरिफूल इस्माल आणि मेहिदी हसनची साथ लाभेल.

’ फलंदाजीची मदार शाकिबसह लिटन दास, नजमुल शांटो, महमदुल्ला आणि मुशफिकूर रहीम यांच्यावर असेल.

वेळ : सकाळी १०.३० वा.