ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचे सर्वेक्षण
नेतृत्व शैलीच्या पद्धतीचा थेट परिणाम आयपीएलमधील संघांच्या प्रदर्शनावर पडतो. त्यामुळे कर्णधाराची खेळी फार महत्त्वाची ठरते. ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टन्सीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वक्षमतेला दूरदर्शी आणि सहभागास प्रोत्साहन ठरणारी असल्याचं म्हटलय. सदर निष्कर्ष हा आयपीएलमधील संघ कर्णधारांच्या नेतृत्वक्षमेतेला अनुसरुन करण्यात आला आहे.
“आयपीएलमध्ये संघाचे ३० टक्के प्रदर्शन हे संघ कर्णधाराच्या नेतृत्व शैलीवर, तसेच आयपीएलच्या गुणतालिकेत संघाचे स्थान कर्णधाराच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचे निदर्शनास आले आहे” असे ग्लोबल कन्सल्टन्सीचे मत आहे.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One third of ipl team show depends on leadership style study
First published on: 27-05-2013 at 08:55 IST