क्वालालंपूर : भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ५०० दर्जा) बुधवारी विजयी सलामी दिली.जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असणाऱ्या सिंधूने स्कॉटलंडच्या ख्रिास्टी गिलमोरला २१-१७, २१-१६ असे सरळ गेममध्ये नमवत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. आता सिंधूसमोर कोरियाच्या सिम यू जिनचे आव्हान असेल.

अन्य सामन्यात भारताच्या अश्मिता चलिहाने चायनीज तैपेइच्या लिन सिह युनवर २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जने जपानच्या ताकुमा ओबायाशीला २१-१६, २१-१७ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत जागतिक क्रमवारीत ५३व्या स्थानी असणाऱ्या बी. सुमीत रेड्डी आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या हाँगकाँगच्या लुइ चुन वाइ आणि फु चि यान जोडीला २१-१५, १२-२१, २१-१७ असे नमवत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या कृष्ण प्रसाद गारगा आणि साई प्रतीक जोडीने मिंग चेन लू व टँग काइ वेई जोडीला २३-२१, २१-११ असे नमवले.

नेपाळचा निसटता पराभव
SA VS NEP T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेने नेपाळला चमत्कारापासून रोखलं; अवघ्या एका धावेने थरारक विजय
spain vs croatia match in euro 2024
Euro 2024 : अनुभवाला तरुणाईचे आव्हान; आज युरो फुटबॉलमध्ये क्रोएशिया-स्पेन एकमेकांसमोर
Virat Kohli form in focus ahead of final group clash
कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष;भारताची आज कॅनडाशी अखेरची साखळी लढत, बुमरा, पंतकडून अपेक्षा
naseem shah
USA VS IRE T20 World Cup: पाकिस्तान ट्वेन्टी२० वर्ल्डकपमधून माघारी; अमेरिकेचं सुपर८चं स्वप्न साकार
azam khan fitness mohammad hafeez
“संपूर्ण संघाला २ किमी धावण्यासाठी १० मिनिटं लागतात, पण आझम खान…”, फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचा टोला
USA vs IRE Match if Cancelled Due to rain what will be super 8 qualification scenario
USA vs IRE सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ सुपर८ मध्ये पोहोचणार? पाकिस्तानसाठी कसं असणार समीकरण
Netizens Call Out Oracle After Saurabh Netravallkar sister revelas he work from hotel after t20 wc matches
T20 WC 2024: ‘हे तर टॉक्सिक वातावरण’, काम आणि क्रिकेट यामध्ये कसरत करणाऱ्या सौरभ नेत्रावळकरच्या कंपनीवर नेटीझन्सची टीका
Shakib Al hasan reply to virender sehwag
‘कोण वीरेंद्र सेहवाग?’, ‘त्या’ टीकेवर शाकिब अल हसनचे उर्मट उत्तर; VIDEO व्हायरल
Ball Stuck in Tanzid Hasan Helmet Video
BAN vs NED सामन्यातील विचित्र घटना, डोळ्याच्या दिशेने येणारा चेंडू हेल्मेटमध्ये अडकला अन्… VIDEO व्हायरल