टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पाकिस्तानकडून खेळलेले इमाद वसीम आणि मोहम्मद आमिर गेल्या दोन दिवसांत निवृत्त झाले आहेत. आता पाकिस्तानचा अजून एक वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानही निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानच्या या ३ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इरफानची उंची क्रिकेटविश्वात नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. त्याची उंची ७ फुटांपेक्षा जास्त होती. याशिवाय त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे.

पाकिस्तानचा सर्वात उंच वेगवान इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिकेटला अलविदा करत असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझ्या सहकाऱ्यांचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानायचे आहेत. तुम्ही दिलेलं प्रेम, पाठिंबा आणि अविस्मरणीय आठवणींसाठी धन्यवाद. ज्या खेळाने मला सर्व काही दिले त्याला मी पाठिंबा देत राहीन आणि त्याचा आनंद घेत राहीन.

हेही वाचा – IND vs AUS: सिराजची युक्ती अन् नितीश रेड्डीने मिळवून दिली विकेट, लबुशेनला बेल्सची परत अदलाबदली करणं पडलं महागात; VIDEO व्हायरल

मोहम्मद इरफानने २०१९ मध्ये पाकिस्तानी संघाकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. गेल्या पाच वर्षांपासून तो संघाबाहेर आहे. २०१० मध्ये, त्याने पाकिस्तानी संघासाठी पदार्पण केले आणि नंतर संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले. त्याने ४ कसोटीत १० विकेट्स, ६० एकदिवसीय सामन्यांमध्ये ८३ विकेट आणि २२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६ विकेट घेतले.

हेही वाचा – Mohammed Shami: शमीला ऑस्ट्रेलिया नाही हैदराबादचं मिळालं तिकीट, गाबा कसोटीदरम्यान आली मोठी अपडेट

भारताविरूद्ध केले होते टी-२० पदार्पण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद इरफानची कसोटी कारकीर्द फार मोठी नसली तरी एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकट्याने पाकिस्तानी संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. २०१२ मध्ये बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताविरुद्ध पाकिस्तानी संघाकडून त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर चार षटकात २५ धावा देऊन एक विकेट घेतली.