Shaheen Afridi Record: पाकिस्तानचा संघ वनडे मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजी शाहीन आफ्रिदीने दमदार गोलंदाजी केली. पहिल्याच सामन्यात त्याने ५ गडी बाद करून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. ४ गडी बाद करताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या यजमान वेस्टइंडिजचा संपूर्ण डाव ४९ षटकात अवघ्या २८० धावांवर आटोपला. यादरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने ४८.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. यासह हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला.
शाहीन आफ्रिदीने या विक्रमात राशिद खानला टाकलं मागे
या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदीने ८ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ५१ धावा खर्च केल्या आणि ४ गडी बाद केले. यासह वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंतम ६५ सामन्यांमध्ये एकूण १३१ गडी बाद केले आहेत. यासह ६५ वनडे सामने खेळून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शाहीन आफ्रिदी अव्वल स्थानी पोहोचला आहे. या विक्रमात त्याने अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानला मागे टाकलं आहे. राशिद खानच्या नावे ६५ वनडे सामन्यांमध्ये १२८ गडी बाद करण्याची नोंद आहे./
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिज संघाकडून एविन लुईसने ६० धावांची खेळी केली. तर केसी कार्टीने ३०, कर्णधार शाई होपने ५५, शेरफेन रूदरफोर्डने १०, रोएस्टन चेसने ५३ धावांची दमदार खेळी केली. तर पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदीने ४ आणि नसीम शाहने ३ गडी बाद केले. तर सॅम अयुब, सुफियान मुकीम आणि सलमान अली आगा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानकडून सलामीला फलंदाजी करताना अब्दुल्ला शफिकने २९ धावांची खेळी केली. तर बाबर आझमने ४७, कर्णधा मोहम्मद रिझवानने ५३, सलमान अली आगाने २३ धावा केल्या. तर शेवटी हसन नवाजने ६३ आणि हुसेन तलटने नाबाद ४१ धावांची खेळी करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.