पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांनी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रज्ञा गद्रे-सिक्की रेड्डी, प्रणव चोप्रा-अक्षय देवलकर यांनीही विजयी आगेकूच केली. तरुण कोना-सिक्की रेड्डी तसेच अरुण विष्णू-अपर्णा बालन यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या कश्यपने नेदरलँड्सच्या इरिक मेजिसवर २१-१७, २१-१० असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत त्याची लढत व्हिएतनामच्या नग्युेन तिइन मिन्हशी होणार आहे. इंडोनेशिया स्पर्धेचे जेतेपद पटकवणाऱ्या प्रणॉयने ब्राझीलच्या अलेक्स युवान जोंगवर २१-१२, २१-१६ अशी मात केली. दुसऱ्या फेरीत ११व्या मानांकित प्रणॉयची लढत युगांडाच्या एडविन इकिरिंगशी होणार आहे.
महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे आणि सिक्की रेड्डी जोडीने जर्मनीच्या इसाबेल हेरटिच आणि बिरगिट मिचेल्स जोडीला १६-२१, २१-१५, २१-१४ असे नमवले. मिश्र दुहेरीत तैपेईच्या लाओ मिन चुन आणि चेन सिओ ह्य़ुआन जोडीने सिक्की रेड्डी आणि तरुण कोना जोडीचा २१-१३, २१-१७ असा पराभव केला. रशियाच्या इव्हेन्जी ड्रेमीन आणि इव्हेन्जी डिमोव्हा जोडीने अरुण विष्णू आणि अपर्णा बालन जोडीवर २१-१८, १०-२१, २४-२२ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा जोडीने रशियाच्या निकिता खाकीमोव्ह आणि व्हॅसिली कुझनेत्सोव्ह जोडीवर १७-२१, २१-११, २१-११ अशी मात केली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2015 रोजी प्रकाशित
कश्यप, प्रणॉयची विजयी सलामी
पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांनी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रज्ञा गद्रे-सिक्की रेड्डी, प्रणव चोप्रा-अक्षय देवलकर यांनीही विजयी आगेकूच केली.

First published on: 11-08-2015 at 12:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parupalli kashyap hs prannoy enter 2nd round of world badminton championship