इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपने सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या चेन लाँगवर मात केली. बॅडमिंटन पुरूष एकेरीत कश्यपने दुसऱयांना चेन लाँगला धुळ चारली आहे. तब्बल ६३ मिनिटांच्या या चुरशीच्या लढाईत पहिल्या सेटमध्ये १४-२१ अशी निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर कश्यपने पुढील दोन सेटमध्ये २१-१७, २१-१४ असे दमदार पुनरागमन करत चेन लाँगला धक्का दिला. या विजयासह कश्यपने स्पर्धेच्या उपांत्यफेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2015 रोजी प्रकाशित
भारताच्या पी. कश्यपची अव्वल मानांकित चेन लाँगवर मात
इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपने सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या चेन लाँगवर मात केली.

First published on: 05-06-2015 at 03:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parupalli kashyap stuns world no 1 chen long enters indonesia open semis