Australia vs Afghanistan, Glenn Maxwell 201 Knock: ऑस्ट्रेलियाच्या ९१ धावांवर सात विकेट पडल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स फलंदाजीला आला, तेव्हा त्याचे लक्ष्य २०० धावांपर्यंत पोहोचण्याचे होते. जेणेकरून बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषकातील शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी निव्वळ धावगती चांगली राहील. पण ग्लेन मॅक्सवेलच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने दुसऱ्या टोकाकडून ‘एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी’ पाहिली. मॅक्सवेलने १२८ चेंडूत २०१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला आणि संघाला उपांत्य फेरीत नेले.

सामन्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, “जेव्हा मी क्रीजवर आलो, तेव्हा माझ्या मनात होते की, निव्वळ धावगतीनुसार आम्ही २०० धावा करू. जेव्हा मॅक्सवेल १०० धावांवर पोहोचला तेव्हा मला वाटले की आपल्याला आणखी १२० धावा कराव्या लागतील पण विजयाचा विचार माझ्या मनात नव्हता. तो म्हणाला, “मॅक्सवेल थोडा वेगळा आहे. तो नेहमी जिंकण्यासाठी खेळतो. मी कसा तरी २०० पर्यंत पोहोचण्याचा विचार करत होतो, मात्र तो जिंकण्यासाठी खेळत होता.” ऑस्ट्रेलियाने २५० पर्यंत मजल मारल्यानंतर पॅट कमिन्सला वाटले की चमत्कार घडू शकतो.

Kieron Pollard apologise female fan
MLC 2024 : चाहतीच्या खांद्याला लागला चेंडू, पोलार्डने केली विचारपूस, घेतली भेट, सेल्फी घेत दिला ऑटोग्राफ
England scored more than 400 runs in both innings
ENG vs WI 2nd Test : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ मोठा पराक्रम
, Shamar Joseph six video
ENG vs WI 2nd Test : शमर जोसेफच्या षटकराने प्रेक्षक गॅलरीचे तुटले छत, चाहते थोडक्यात बचावले, VIDEO व्हायरल
Smriti Mandhana fan Adeesha Herath video
Smriti Mandhana : नॅशनल क्रशने जिंकली चाहत्यांची मनं, आपल्या स्पेशल फॅनला गिफ्ट केली खास गोष्ट, पाहा VIDEO
Parthiv Patel Statement on RCB
VIDEO: “RCB म्हणजे फक्त कोहली, गेल आणि डिव्हिलियर्स…” पार्थिव पटेलचा गौप्यस्फोट, आरसीबीला जेतेपद का पटकावता आलं नाही?
Who is Gus Atkinson He Took 12 Wickets in Test Debut
कसोटी पदार्पणात १२ विकेट घेणारा इंग्लंडचा Gus Atkinson आहे तरी कोण? पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम
ENG beat WI by an Inning and 113 Runs
ENG vs WI: इंग्लंडने जेम्स अँडरसनला दिला विजयी निरोप, अ‍ॅटकिन्सनच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव
Why West Indies Did Not Give Guard of Honour to James Anderson
ENG vs WI: जेम्स अँडरसनला वेस्ट इंडिज संघ ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणार होता पण… खेळाडूने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं?

पॅट कमिन्स पुढे म्हणाला, “स्पिनर्सच्या षटकानंतर, जेव्हा सुमारे ४० धावांची आवश्यकता होती, तेव्हा मला वाटले की मॅक्सवेल जरी इथे बाद झाला तरी आपण जिंकू शकतो. शेवटच्या २० मिनिटांतच मला असे वाटले होते.” मॅक्सवेलच्या उजव्या पायाला स्क्रॅम येत होते आणि अनेकवेळा त्याला वैद्यकीय उपचारासाठी टाईम आऊट घ्यावा होता. पण एवढे असूनही त्याने अशक्या वाटणारा विजय शक्य करुण दाखवला.

हेही वाचा – Glenn Maxwell : द्विशतकवीर मॅक्सवेलचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक; म्हणाला, “माझ्या अख्ख्या आयुष्यात…”

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार म्हणाला, “मॅक्सवेल वेगाने धावा काढत होता. ही खेळपट्टी सोपी होणार हे आम्हाला माहीत होते. मॅक्सवेल क्रीजवर असताना रन रेट ही समस्या जाणवत नव्हती. हा संपूर्ण वन मॅन शो होता आणि त्याने विजय सोपा केला.” ऑस्ट्रेलियन कर्णधाराने मात्र कबूल केले की या विश्वचषकात एक युनिट म्हणून त्यांना अद्याप सर्वोत्तम खेळ करता आलेला नाही. तो म्हणाला, “मी संघाच्या कामगिरीवर खूश आहे. संथ सुरुवातीनंतर, आम्ही वेग पकडला पण एक युनिट म्हणून अजून चांगला खेळ करू शकलो नाही.”

हेही वाचा – Aus vs Afg: ग्लेन मॅक्सवेलरुपी वादळ घोंघावतं तेव्हा!

सामन्याबद्दल बोलायचे, तर एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ३९ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ५ गडी गमावून २९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४६.५ षटकांत सात विकेट गमावत २९३ धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह कांगारू संघाने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे.