शुक्रवारी कराचीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या जीवाला धोका होता. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेमुळे पीएसएल पुढे ढकलले जाऊ शकते, असे बोलले जात होते, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी म्हणाले की, दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सुरूच राहणार आहे. तसेच खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रपती दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल स्टेडियमवर खेळाडू सराव करत होते –

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या शार-ए-फैसलजवळील कराची पोलिस कार्यालयावर हल्ला केला. ही चकमक तीन तासांहून अधिक काळ चालली. यामध्ये सर्व दहशतवादी मारले गेले.
३० जानेवारी रोजी पेशावरमधील मशिदीवर झालेल्या हल्ल्यानंतर तो अनेक वर्षांतील कराचीतील हा पहिला मोठा हल्ला होता. हल्ल्याच्या वेळी ग्लॅडिएटर्स संघाचे खेळाडू नॅशनल स्टेडियममध्ये सराव करत होते. ज्यामुळे त्यांना त्यांच्या हॉटेलमध्ये परत जाण्यास उशीर झाला, परंतु पीसीबीने सांगितले की संघांना पुरविलेल्या सुरक्षेबद्दल विश्वास आहे.

संघांसाठी राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा –

पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “पीएसएल ८ नियोजित प्रमाणे पुढे होईल. शुक्रवारची घटना क्रिकेटशी संबंधित नव्हती. “आम्ही स्थानिक आणि परदेशी सुरक्षा तज्ञांसह सर्व भागधारकांसह जवळून काम करत आहोत. पीसीबी सर्व सहभागींना संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.”

हेही वाचा – IND vs AUS 2nd Test: ‘विराट कोहलीला वाटत असेल…’, पंच नितीन मेननच्या वादग्रस्त निर्णयावर नॅथन लायनचे मोठे वक्तव्य

सेठी पुढे म्हणाले, ”नेहमीप्रमाणे सुरक्षा तज्ञ आणि कायदा अंमलबजावणी एजन्सींसोबत जवळून काम करत राहील. कोणतीही कसर सोडू नये, यासाठी राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा दल संघ आणि अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcb chief najan sethi has decided to continue the pakistan super league despite the terrorist attack in karachi vbm
First published on: 19-02-2023 at 11:26 IST