Pakistan Cricket Board on Salaman Butt: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी राष्ट्रीय निवड समितीमध्ये माजी कर्णधार सलमान बट्टचा समावेश केला आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आयसीसीने सलमानवर पाच वर्षांची बंदी घातली होती. यानंतर २०१६ मध्ये या खेळाडूने क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. ३९ वर्षीय सलमानसह माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमल आणि राव इफ्तिखार अंजुम यांना मुख्य निवड समितीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज वहाब रियाझला मुख्य निवडकर्ता बनवले आहे.

ऑगस्ट २०१० मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली बट्टला पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. २०१६ साली क्रिकेटमध्ये परतल्यानंतर, बट्टने देशांतर्गत स्पर्धांमध्ये फलंदाज आणि कर्णधार म्हणून खूप यश मिळवले, परंतु पुन्हा कधीही राष्ट्रीय संघासाठी त्याचा विचार केला गेला नाही. मात्र, फिक्सिंगमध्ये त्याला साथ देणाऱ्या मोहम्मद आमिरचा २०१६ मध्ये पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला होता.

Rashid Latif on jay shah and team india
“टीम इंडिया पाकिस्तानमध्ये येणार”, जय शाह ICC चे अध्यक्ष झाल्यावर रशीद लतीफचा मोठा दावा; म्हणाला, “५० टक्के…”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Hyundai Alcazar Facelift New Tvc Released With Brand Ambassador Shahrukh Khan
Hyundai Alcazar Facelift: नवीन ह्युंदाई अल्काझार कारची मार्केटमध्ये जोरदार चर्चा; शाहरुख खानसोबतचा नवा व्हिडिओ समोर
Hindenburg Research alleges SEBI chief Madhabi Buch
‘सेबी’ अध्यक्षांनी सल्लागार कंपनीतून महसूल मिळविल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट, ‘लाभाचे पद’ धारण करणे संभाव्य नियमभंगच!
PR Sreejesh said Vinesh Phogat and deserves a silver medal in olyampic 2024
Sreejesh on Vinesh : ‘ती रौप्यपदकासाठी पात्र आहे पण खेळात नियम…’, विनेशबद्दल श्रीजेशचे मोठे वक्तव्य
javelin throw, paris olympics 2024, Neeraj Chopra, Arshad Nadeem
पॅरिसपूर्वी ९ वेळा नीरज चोप्रा सरस ठरला होता अर्शद नदीमसमोर… अर्शद नदीमची अनोखी लढाई… मैदानवरची, मैदानाबाहेरची!
Narendra modi neeraj chopra
Neeraj Chopra : “नीरजच्या रौप्य पदकामुळे…”, पंतप्रधान मोदींची शाबासकी; म्हणाले, “देशातील नव्या खेळाडूंसाठी…”
Paris Olympics 2024 Sports Ministry provides 40 portable AC
Paris Olympics 2024 : स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये उष्णतेमुळे खेळाडू हैराण, भारताच्या क्रीडा मंत्रालयाने पुरवले ४० एसी, VIDEO व्हायरल

पीसीबीने गेल्या महिन्यात देशांतर्गत स्पर्धांसाठी माजी सलामीवीर बट्टचा समालोचन पॅनेलमध्ये समावेश केला होता. सध्या तो राष्ट्रीय टी-२० चॅम्पियनशिपमध्ये व्यस्त आहे. “मुख्य निवडकर्त्याचे सल्लागार सदस्य म्हणून  न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. जी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी दौर्‍याच्या समाप्तीनंतर १२ जानेवारी २०२४ रोजी सुरू होणार आहे,” पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे. संघ निवडीचे काम पूर्ण न झाल्यास, निवड समितीच्या सल्लागार सदस्यांना कौशल्य शिबिरे आयोजित करण्यासारखी अतिरिक्त कामेही सोपवली जाऊ शकतात,” असेही त्या निवेदनात म्हटले आहे.

बट्ट, कामरान, मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ आणि माजी कसोटी वेगवान गोलंदाज अंजुम हे तिघेही पाकिस्तान संघात पाकिस्तान संघाचे संचालक मोहम्मद हाफिजसह एकत्र खेळले. कामरानने १५ वर्षांच्या कारकिर्दीत ५३ कसोटी, १५७ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामने खेळले, तर बट्टने ३३ कसोटी, ७८ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने आणि अंजुमने २००४ ते २०१० पर्यंत एक कसोटी, ६२ एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळले.

हेही वाचा: IPL 2024: आगामी आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्सची ‘या’ पाच खेळाडूंवर असणार नजर, कोणते आहेत? जाणून घ्या

बट्टच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तानने २०१० मध्ये हेडिंग्ले येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी आणि ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धची कसोटी जिंकली. आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करताना त्याने नेहमीच अन्यायाची तक्रार केली आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य प्रशिक्षक वकार युनूस यांनी राष्ट्रीय संघात पुनरागमनासाठी त्याच्या नावाची शिफारस केली होती, परंतु माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याला संघात पुनरागमन करण्यास नकार दिला होता.

बट, अमीर आणि मोहम्मद आसिफ हे तिघेही इंग्लंडमधील नॅशनल क्राईम एजन्सीने स्पॉट-फिक्सिंगमध्ये दोषी आढळले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांना तुरुंगात टाकले आणि बंदी घातली. सलमान बटशिवाय वहाब रियाझ आणि कामरान अकमल यांच्यावरही फिक्सिंगचे आरोप आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ संचालक आणि प्रशिक्षक मोहम्मद हाफीज नेहमीच फिक्सिंगच्या विरोधात असतो. त्याने आमिरसोबत खेळण्यासही नकार दिला होता. अशा परिस्थितीत त्याच्या सलमानसोबत काम करण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.