scorecardresearch

Premium

IPL 2024: आगामी आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्सची ‘या’ पाच खेळाडूंवर असणार नजर, कोणते आहेत? जाणून घ्या

IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२४ लिलावापूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काही खेळाडूंना करारमुक्त केले असून कोर ग्रुप कायम ठेवला आहे.

IPL 2024: Chennai Super Kings eyeing these five players in upcoming IPL auction, who are they find out
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२४ लिलावापूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सौजन्य- (ट्वीटर)

Indian Primer League 2024: आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३चे विजेतेपद जिंकल्यानंतर यशाचा नवा अध्याय लिहिला. संघाने २०२३च्या आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवला आणि त्यांचे पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले. आता आयपीएल २०२४च्या लिलावापूर्वी, चेन्नईने काही धोरणात्मक पावले उचलली असून काही खेळाडूंना सोडले आहे आणि कोर ग्रुप कायम ठेवला आहे. आपला संघ मजबूत करण्यासाठी यावेळच्या लिलावात ते कोणकोणत्या संभाव्य खेळाडूंना खरेदी करू शकतात, ते जाणून घेऊया.

चेन्नई सुपर किंग्सने कायम ठेवलेल्या खेळाडूंवर एक नजर टाकूया:

एम.एस. धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चाहर, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख राशीद , मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना.

KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला
BCCI Secretary Jai Shah instructs IPL franchises
IPL 2024 : टी-२० विश्वचषकापूर्वी बीसीसीआयचा आयपीएल फ्रँचायझींना इशारा! ‘या’ मार्गदर्शक तत्त्वांचे करावे लागणार पालन
Paytm Payments Bank, PPBL, Reserve Bank of India, RBI
विश्लेषण : पेटीएम पेमेंट बँकेचे काय चुकले? नव्या जमान्याच्या ‘पेमेंट बँकां’चे मरण अटळ आहे?
Mark Zuckerberg will receive 700 million dollars
Meta Dividend : फेसबुक पहिल्यांदाच देणार लाभांश, मार्क झुकरबर्गला मिळणार ७०० मिलियन डॉलर्स

चेन्नई सुपर किंग्जने कोणत्या खेळाडूंना सोडले

जाहीर केलेल्या यादीत बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस आणि काइल जेमिसन यांचा समावेश आहे. राखीव यादी भक्कम दिसत असताना, सीएसकेला अंबाती रायुडूची जागा भरून काढणे आवश्यक आहे आणि त्यांच्या वेगवान गोलंदाजी विभागात आणखी गोलंदाज घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा: IND vs AUS: श्रेयसच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया मजबूत, चाहरलाही मिळू शकते संधी; जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

मनीष पांडे

चेन्नई सुपर किंग्जमधून अंबाती रायुडू बाहेर पडल्याने, अनुभवी मनीष पांडेला संघात सामील करून फ्रँचायझी त्याची पोकळी भरून काढू इच्छित आहे. त्याच्या संयमित फलंदाजी आणि डाव उभारण्यासाठी ओळखला जाणारा, पांडे सीएसकेच्या मधल्या फळीत सखोलता वाढवू शकतो. आयपीएलमधील त्याचा ट्रॅक रेकॉर्ड, भागीदारी निर्माण करण्याची आणि आव्हानात्मक परिस्थितीत संघाचे नेतृत्व पुढे नेण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. फिरकी आणि वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी पांडेचे सातत्य आणि कौशल्य त्याला एक आदर्श फलंदाज बनवते. आगामी आयपीएल सीझनमध्ये चाहत्यांना मनीष पांडेला ते पिवळ्या जर्सीत पाहू शकतात.

पॅट कमिन्स

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला १६.२५ कोटींमध्ये विकत घेतल्यानंतर सीएसके जखमी अष्टपैलू खेळाडूला वगळण्याचा विचार करू शकतो. स्टोक्स २ सामन्यात केवळ १५ धावा करू शकला आणि गेल्या हंगामात त्याने फक्त एक षटक टाकले. या हंगामात ते बेन स्टोक्सच्या जागी पॅट कमिन्सवर दाव लावू शकतात. याआधी आयपीएलच्या ६ मोसमात त्याने चांगली कामगिरी केली आहे. कमिन्सने ४२ सामन्यांत १५० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत ४५ विकेट्स घेतल्या आहेत.

जोश हेझलवुड

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधून मुक्त झाल्यानंतर, हेझलवूडची घातक गोलंदाजी सीएसकेच्या वेगवान ताफ्यात नवीन ताकद आणू शकते. सुरुवातीच्या यशामुळे तसेच तो त्याच्या गोलंदाजीतील लाईन आणि लेंथमुळे खूप प्रसिद्ध झाला आहे. नावलौकिक असलेल्या हेझलवूडच्या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे चेन्नई संघाच्या वेगवान गोलंदाजीचा अनुभव वाढेल. सातत्यपूर्ण दबाव कायम ठेवण्याची आणि आघाडीच्या फळीतील फलंदाजांना लवकर बाद करण्याची त्याची क्षमता, त्याला टी-२० फॉरमॅटमध्ये एक जबरदस्त खेळाडू बनवते. अशा परिस्थितीत हेझलवुड पिवळ्या जर्सीत दिसू शकतो.

हेही वाचा: IND vs AUS: मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज! कसे असेल रायपूरचे हवामान आणि खेळपट्टी अंदाज? जाणून घ्या

सदिरा समरविक्रमा

आपले पहिले शतक झळकावणाऱ्या केदार जाधवच्या जागी सीएसकेला श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज सदिरा समरविक्रमाची निवड करायची आहे. सदीरा हा लंकेचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्याने ५० पेक्षा जास्त सरासरीने एका हंगामात तब्बल ३७३ धावा केल्या आहेत.

अजमतुल्ला उमरझाई

अजमतुल्ला उमरझाईने २०२३च्या विश्वचषकात ९ सामन्यात ३५० हून अधिक धावा आणि ७ विकेट्स घेत जगाला आश्चर्यचकित केले. २३ वर्षीय हा खेळाडू त्याच्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा आणि स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज होता. त्‍याचा टी-२०मध्‍ये रेकॉर्डही फारसा खराब नाही. आतापर्यंत खेळलेल्या ६२ सामन्यांमध्ये त्याने १२९.५१च्या सरासरीने ५८८ धावा केल्या आहेत आणि ५९ विकेट्स घेतल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chennai super kings can buy these 5 players in ipl 2024 auction avw

First published on: 01-12-2023 at 19:11 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×