प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल 8) ४४व्या सामन्यात यूपी योद्धाने बंगळुरू बुल्सविरुद्ध ४२-२७ असा एकतर्फी विजय मिळवून इतिहास रचला. त्यांचा या मोसमातील हा दुसरा विजय आहे, तर चालू हंगामातील बंगळुरू बुल्सचा हा दुसरा पराभव आहे. या सामन्यात श्रीकांत जाधवने चांगली कामगिरी केली. यूपी योद्धाचा स्टार खेळाडू परदीप नरवालचा खराब फॉर्म कायम राहिला आणि त्याला सामन्यात एकही गुण मिळवता आला नाही. या लाजिरवाण्या कामगिरीमुळे त्याला पूर्वार्धात बदली करण्यात आले. दुसरीकडे पवन सेहरावतलाही या सामन्यात केवळ ५ गुण मिळवण्यात यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या सत्रानंतर, यूपी योद्धाने बंगळुरूविरुद्ध १९-१४ अशी आघाडी घेतली. एका वेळी या सामन्यात पूर्णपणे बंगळुरू बुल्सचे वर्चस्व होते आणि त्यांना यूपी योद्धाला अनेक वेळा ऑलआउट करण्याची संधी मिळाली. यूपी योद्धाच्या बचावाने तीन सुपर टॅकलसह उत्कृष्ट कामगिरी केली आणि बुल्सवर सर्व दबाव टाकला. दरम्यान, श्रीकांत जाधव आणि मोहम्मद तघी यांनीही चढाईत महत्त्वाचे गुण मिळवले. या कारणास्तव, पहिल्या हाफच्या शेवटी बेंगळुरू बुल्सचा एकच खेळाडू सक्रिय राहिला होता. परदीप नरवालने दोन रेड टाकल्या आणि दोन्हीमध्ये त्याला मोहित सेहरावतने बाद केले.

उत्तरार्धाच्या पहिल्या चढाईत यूपी योद्धाने बंगळुरू बुल्सला ऑलआऊट केले. यूपीच्या बचावफळीने आपले वर्चस्व कायम राखत त्याला पुन्हा एकदा बाद केले. दरम्यान, बुल्सने सातत्याने गुण मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु यूपीच्या बचावफळीने पवन सेहरावतला गुण मिळवू दिले नाहीत. ३१व्या मिनिटाला भरतने सुपर रेडमध्ये तीन गुण मिळवून दोन्ही संघांमधील अंतर कमी केले. यूपीने पुन्हा एकदा सुपर टॅकल करत ऑलआऊटचा धोका टाळला.

हेही वाचा – Pro Kabaddi League : पुणेरी पलटणनं बंगाल संघाला दाखवला इंगा; ३९-२७ अशी सहज चारली धूळ!

श्रीकांत जाधवनेही यूपी योद्धासाठी शानदार सुपर १० मारला. याशिवाय बचावातही त्याने ३ गुण मिळवले. भरतने बुल्ससाठी त्यांचा सुपर १० पूर्ण केला आणि हा त्याच्या कारकिर्दीतील पहिला सुपर १० होता. यूपीच्या बचावफळीने दमदार कामगिरी केली आणि यामुळे त्यांनी एकतर्फी विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pkl 2021 22 bengaluru bulls vs up yoddha latest score adn
First published on: 09-01-2022 at 22:04 IST