पुणेरी पलटणने प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) १०८व्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सचा ४५-२७ असा पराभव करत नववा विजय नोंदवला. पुणेरी पलटणच्या शानदार विजयाने त्यांच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. हरयाणा स्टीलर्सचा १९ सामन्यांतील हा सातवा पराभव असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

पूर्वार्धानंतर पुणेरी पलटणचा संघ २६-७ असा पुढे होता. हरयाणा स्टीलर्सने सामन्याच्या सहाव्या मिनिटाला पुणेरी पलटणला सर्वबाद करून जबरदस्त आघाडी घेतली होती. हे सत्र संपण्यापूर्वी पलटणने पुन्हा एकदा हरयाणा स्टीलर्सला ऑलआऊट केले आणि पहिल्या २० मिनिटांतच सामना जवळपास एकतर्फी केला.

हेही वाचा – IND vs WI : व्वा रे हिटमॅन..! रोहित शर्मानं रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच कॅप्टन!

उत्तरार्धाच्या सुरुवातीला पुणेरी पलटणने पुन्हा एकदा हरयाणा स्टीलर्सला ऑलआऊट केले आणि ३०व्या मिनिटाला सामन्यात मोठी आघाडी घेतली. पलटणसाठी मोहित गोयतने सुपर १० पूर्ण केला आणि सामन्यात २ टॅकल पॉइंटसह १२ गुण घेतले. अस्लम इनामदारने अष्टपैलू कामगिरी करताना ६ रेड आणि २ टॅकल पॉइंट घेतले. हरयाणा स्टीलर्ससाठी, आशिषने अष्टपैलू कामगिरी करताना ५ रेड आणि ३ टॅकल पॉइंट्स घेतले, परंतु कर्णधार विकास कंडोला वाईटरित्या फ्लॉप ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या सामन्यात परदीप नरवालच्या ३ सुपर रेडच्या जोरावर यूपी योद्धाने जयपूर पिंक पँथर्सला ४१-३४ असे पराभूत केले. या विजयासह यूपीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी तर जयपूरचा संघ सहाव्या स्थानी आहे.