प्रो कबड्डी लीगच्या (PKL 2021) अत्यंत रोमांचक सामन्यात गुजरात जायंट्सने तमिळ थलायवाजचा ३७-३५ असा पराभव करून स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी सामना फिरला आणि जबरदस्त पुनरागमन करूनही तामिळ थलायवाज संघाला विजय मिळवता आला नाही. पूर्वार्धानंतर गुजरात जायंट्सचा संघ १७-१४ने पुढे होता. तमिळ थलायवाजचा संघ १८व्या मिनिटाला ऑलआऊट झाला. उत्तरार्धात ३५व्या मिनिटापर्यंत गुजरात जायंट्सने आघाडी राखली होती, ३६व्या मिनिटाला तमिळ थलायवाजने त्यांना ऑलआऊट करत सामन्याचे चित्र बदलले.

मात्र, गुजरात जायंट्सने शेवटच्या क्षणी सामन्यात रंगत आणली आणि महेंद्र राजपूतने शेवटच्या चढाईत एक गुण घेत संघाला विजय मिळवून दिला. गुजरात जायंट्ससाठी, महेंद्र राजपूतने सामन्यात ९ गुण घेतले, तर सुनीलने ५ टॅकल गुण घेतले. तमिळ थलायवाजसाठी, मनजीतने १२ गुण घेतले. तर अजिंक्य पवारने सामन्यात एकूण १० गुण मिळवले.

हेही वाचा – BCCI Central Contracts : दुष्काळात तेरावा महिना..! फॉर्म हरवलेल्या रहाणे-पुजाराला बसणार ‘मोठा’ धक्का?

प्रो कबड्डीत आज रंगलेला बंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामनाही रोमांचक ठरला. बंगालने ४०-३९ असा निसटता विजय मिळवला. बंगालकडून मनिंदर सिंगने ९ तर सुकेश हेगडेने ७ गुण घेतले. बंगळुरूकडून पवन सेहरावतने १३ तर चंदन रणजितने ८ गुण घेतले.

८ गुणांची रेड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या सत्रात बंगळुरू बुल्स १३-१४ असा पिछाडीवर पडला होता. बंगळुरूचा स्टार रेडर पवन सेहरावतने दुसऱ्या सत्रात एकापाठोपाठ एक दमदार चढाया केल्या. सामना संपण्यासाठी ११ मिनिटे शिल्लक असताना बंगालचा संघ ऑलआऊटच्या दिशेने वाटचाल करत होता. संघाचा शेवटचा रेडर नबीबक्षने बंगळुरूविरुद्ध चढाई केली. त्याने तांत्रिक गुणांसह बंगालला संजीवनी दिली. त्याने ८ तांत्रिक गुण घेत बंगळुरूला ऑलआऊटसमोर उभे केले. पुढच्याच मिनिटात बंगळुरूचा संघ ऑलआऊट झाला.