MS Dhoni obliges fan’s adorable request video viral : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, एमएस धोनी रांचीमध्ये असलेल्या त्याच्या फार्महाऊसमध्ये त्याची मर्सिडीज AMG G63 चालवत प्रवेश करणार होता, तितक्यात एका चाहत्याने त्याला थांबवत त्याच्याबरोबर एक फोटो क्लिक करण्याची विनंती केली. यानंतर धोनीने नम्रपणे त्याच्यासोबत एक फोटो काढला. त्यानंतर आता लोकांना हाच धोनीचा साधेपणा खूप आवडत आहे.

धोनीचा चाहत्याबरोबरचा व्हिडीओ व्हायरल –

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चाहता धोनीच्या कारजवळ आला आणि म्हणाला, “मला एक फोटो द्याना, एक फोटो प्लीज सर. फक्त एक सेकंद लागेल, प्लीज काच खाली करा सर.” धोनीने सुरुवातीला फोटो क्लिक करण्यास नकार दिला असला तरी नंतर हसत हसत कारची काच खाली करून फॅनला स्वत:बरोबर एक फोटो क्लिक करू दिला. या नम्र स्वभावामुळे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून धोनीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

याआधी धोनीचा त्याच्या कुटुंबासोबतचा एक व्हिडिओ समोर झाला होता. फादर्स डेच्या निमित्ताने धोनीची मुलगी झिवाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली होती, ज्यामध्ये धोनी पत्नी साक्षी, मुलगी झिवा आणि त्याच्या पाळीव कुत्र्यांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्याकडे वेगवेगळ्या जातीचे कुत्रे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. धोनीला कुत्रे पाळण्याचीही खूप आवड आहे आणि त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोनीचे फार्म हाऊस आतून कसे आहे?

रांची येथील एमएस धोनीचे फार्महाऊस अनेक सुविधांनी सुसज्ज आहे. हे फार्महाऊस सात एकरमध्ये पसरले असून त्याची किंमत अंदाजे ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. फार्महाऊसचा बराचसा भाग झाडांनी व्यापलेला आहे आणि एक बाग देखील आहे. क्रिकेटच्या सरावासाठी खेळपट्टी, नेटसह व्यायामशाळा, स्विमिंग पूल आणि इनडोअर स्टेडियमही येथे बांधण्यात आले आहे. लिव्हिंग एरियाजवळही अनेक झाडे आणि वनस्पती आहेत, जे या फार्महाऊसला एक अद्भुत स्वरूप देतात.