scorecardresearch

प्रीमियर लीग फुटबॉल : लिव्हरपूल-टॉटनहॅम सामन्यात बरोबरी

लिव्हरपूलचे घरचे मैदान अ‍ॅनफिल्डवर झालेल्या या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

लिव्हरपूल : लिव्हरपूल आणि टॉटनहॅम या बलाढय़ संघांतील प्रीमियर लीग फुटबॉलचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. या निकालामुळे लिव्हरपूलने (३५ सामन्यांत ८३ गुण) गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले असले, तरी दोन गुण गमावणे त्यांना महागात पडू शकेल. दुसऱ्या स्थानावर असलेल्या मँचेस्टर सिटीचेही ८३ गुण असून त्यांनी लिव्हरपूलपेक्षा एक सामना कमी खेळला आहे.

लिव्हरपूलचे घरचे मैदान अ‍ॅनफिल्डवर झालेल्या या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. उत्तरार्धात मात्र सॉन ह्युंग मिनने (५६वे मिनिट) गोल करत टॉटनहॅमला अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. यानंतर लिव्हरपूलने आक्रमणाचा वेग वाढवला. लुईस डियाझने ७४व्या मिनिटाला गोल झळकावत लिव्हरपूलला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मग दोन्ही संघांनी आणखी एक गोल करत सामना जिंकण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, गोलरक्षक आणि बचावपटूंच्या चांगल्या कामगिरीमुळे बरोबरीची कोंडी अखेपर्यंत कायम राहिली. या बरोबरीमुळे लिव्हरपूलची घरच्या मैदानावर सलग १२ सामने जिंकण्याची मालिका खंडित झाली. सॉन ह्युंग मिन

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Premier league tottenham vs liverpool match draw zws

ताज्या बातम्या