Prithvi Shaw Double Hundred in Ranji Trophy: पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत महाराष्ट्रकडून खेळताना द्विशतक झळकावलं आहे. मुंबई संघाची साथ सोडत पृथ्वी शॉ यंदा महाराष्ट्रकडून खेळत आहे. पहिल्या सामन्यात शॉ ची सुरूवात चांगली झाली नाही आणि तो शून्यावर बाद होत माघारी परतला. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने थेट द्विशतक केलं आहे.
पृथ्वी शॉ ने चंदीगढविरूद्ध सामन्यात महाराष्ट्रासाठी पहिलं रणजी द्विशतक केलं. पृथ्वीने १४१ चेंडूत २७ चौकार आणि ४ षटकारांसह द्विशतक पूर्ण केलं. शॉ चं हे द्विशतक रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसरं सर्वात जलद द्विशतक आहे. शॉने दुसऱ्या डावात फक्त ७२ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. पृथ्वीचं हे १४वं प्रथम श्रेणी शथक आहे. तर पहिल्या डावात तो फक्त ८ धावा करत बाद झाला होता.
महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी पदार्पणात, त्याने केरळविरुद्ध पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात ७५ धावांची शानदार खेळी केली आणि पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. पृथ्वी शॉने महाराष्ट्रासाठी पहिलं शतक झळकावून ऐतिहासिक कामगिरीही केली. हे रणजी क्रिकेटमधील संयुक्त सहावं सर्वात जलद शतक ठरलं आणि फेब्रुवारी २०२४ नंतरचं त्याचं पहिलं शतक आहे.
मुंबई संघाची साथ सोडत महाराष्ट्र संघात दाखल होण्याचा निर्णय पृथ्वी शॉच्या पथ्यावर पडला आहे. नव्या संघासाठी केवळ दुसऱ्याच सामन्यात त्याने वादळी द्विशतक झळकावलं. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत चंदीगढविरुद्ध खेळताना शॉने स्पर्धेच्या एलीट गटातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जलद द्विशतक नोंदवलं.
चंदीगढविरुद्ध फलंदाजी करताना शॉने द्विशतकासह २०२३-२४ हंगामात राहुल सिंगने केलेला विक्रम मागे टाकला. आता शॉ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याच्या पुढे फक्त रवी शास्त्री आहेत, ज्यांनी १९८४-८५ हंगामात १२३ चेंडूत द्विशतक केलं होतं.
मुंबई संघाचा भाग असताना रणजी ट्रॉफीच्या वादग्रस्त हंगामानंतर, त्याच्या वागणुकीवरून सतत टीका होत असल्याने पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट संघटनेपासून (MCA) दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो महाराष्ट्र संघात दाखल झाला आणि तिथून आपल्या नव्या प्रवासाची शानदार सुरुवात केली. सराव सामन्यातच शतकी खेळी करून त्याने दमदार पुनरागमनाची झलक दाखवली.
