एका १४ वर्षीय खेळाडूने ९८ चौकारांसह ५५६ धावा चौपल्या आहेत. डी.के. गायकवाड या चौदा वर्षाखालील स्पर्धेत प्रियांशु मोलियाने हा पराक्रम केला आहे. सामन्याच्या दोन दिवसांमध्ये वडोदरा क्रिकेट अकादमीच्या (व्हीसीए) मैदानावर प्रियांशु मोलियाने हा पराक्रम केला. प्रियांशु मोलिया सध्या भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियांशु मोलियाने फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही आपली चुणूक दाखवली आहे. गोलंदाजी करताना प्रियांशुने विरोधी संघाच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. प्रियांशुच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर योगी क्रिकेट अकादमी ५२ धावांमध्ये गारद झाली. त्यानंतर फलंदाजी करताना प्रियांशु मोलियाने पहिल्या दिवशी ४०८ धावा चोपल्या तर दुसऱ्या दिवशी त्यामध्ये १४८ धावांची भर घातली. प्रियांशु मोलियाने ३१९ चेंडूचा सामना करताना ९८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५५६ धावांचा डोंकर उभा केला. प्रियांशु मोलियाच्या या दमदार खेळीमुळे सध्या क्रीडा विश्वात तो चर्चेचा विषय आहे.

प्रियांशुने केलेल्या दमदार खेळीच्या बळावर त्याच्या संघाचे चार गड्यांच्या मोबदल्यात 826 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रियांशुच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे अमरनाथ यांच्या अकादमीला योगी संघावर तब्बल 690 धावांनी विजय मिळवता आला. ज्यावेळी पहिल्यांदा प्रियांशु मोलियाला पाहिले त्याचवेळी त्याच्यातील कौशल्य आणि गुण ओळखले होते. तो पुढे आणखी चांगल्या खेळी करेल, अशी प्रतिक्रिया अमराथ यांनी दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanshu moliya slams unbeatan 556 runs in a two day game
First published on: 02-11-2018 at 09:27 IST