Australia vs South Africa, WTC Final Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आजचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या अंतिम सामन्याचा चौथ्या दिवशी निकाल लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६९ धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या ८ फलंदाजांना तंबूत पाठवायचं आहे. दरम्यान ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघांना किती रक्कम मिळणार आहे? जाणून घ्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रवेश केला. गेल्या महिन्यात आयसीसीने विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार याबाबत अधिकृत घोषणा केली होती. यावेळी आयसीसीने विजेत्या संघाला मिळणाऱ्या रकमेत दुपटीने वाढ केली आहे.
याआधी २०२१–२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करत मानाची गदा पटकावली होती. त्यावेळी न्यूझीलंड संघाला १.६ मिलियन डॉलर्स म्हणजेच १३ कोटी रुपये दिले गेले होते.
त्यानंतर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यावेळीही विजेत्या संघाला १४ कोटी रुपये दिले गेले होते. मात्र, यावेळी विजयाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. विजेत्या संघाला ३.६ मिलियन म्हणजे ३१ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला २.१६ मिलियन डॉलर्स म्हणजे १८ कोटी रूपये दिले जाणार आहेत.
भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाला १२.३१ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.
विजेत्या संघांना मिळणारी रक्कम
विजेता संघ – ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका- ३१.०५ कोटी
उपविजेता संघ- ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका- १८.६३ कोटी
तिसरा संघ- भारतीय संघ- १२.३१ कोटी
चौथा संघ- न्यूझीलंड – १०.२६ कोटी
पाचवा संघ- इंग्लंड – ८.२१ कोटी
सहावा संघ – श्रीलंका- ७.१८ कोटी
सातवा संघ- बांगलादेश- ६.१५ कोटी
आठवा संघ- वेस्टइंडिज – ५.१३ कोटी
नववा संघ – पाकिस्तान – ४.१० कोटी