प्रो कबड्डी लीगमध्ये आज बुधवारी उपांत्य फेरीचे दोन्ही सामने होणार आहेत. पहिला उपांत्य सामना पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दबंग दिल्लीसमोर बंगळुरू बुल्सचे आव्हान असेल. पाटणा आणि दिल्लीने गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये स्थान मिळवताना उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर यूपी आणि बंगळुरूने एलिमिनेटरमध्ये पुणेरी पलटण आणि गुजरात जायंट्सचा पराभव केला.

यूपीने एलिमिनेटरमध्ये पलटणचा ४२-३१ असा पराभव केला तर बुल्सने जायंट्सचा ४९-२९ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटणाबद्दल बोलायचे झाले तर, २२ सामन्यांत ८६ गुणांसह ते अव्वल, तर दिल्ली २२ सामन्यांत ७५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs SL : रोहितसमोर मोठं टेन्शन..! दीपक चहरनंतर ‘स्टार’ मुंबईकर खेळाडू पडला संघाबाहेर

कधी, केव्हा रंगणार सामने?

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात आज २३ फेब्रुवारी रोजी दोन उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील. पहिला उपांत्य सामना पटना पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दबंग दिल्लीसमोर बंगळुरू बुल्सचे आव्हान असेल. पहिला सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. दुसरा सामना रात्री साडेआठ वाजता होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने भारतातील प्रीमियर स्पर्धेचे प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर मॅच पाहता येईल.

सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ

पाटणा पायरेट्स: मोनू, मोहित, राजवीरसिंह प्रताप राव चव्हाण, जंगकुन ली, प्रशांत कुमार राय सचिन, गुमान सिंग, मोनू गोयत, नीरज कुमार, सुनील, सौरव गुलिया, संदीप, शुभम शिंदे, साहिल मान, मोहम्मदरेजा शदलौई चियाने, साजिन चंद्रशेखर.

यूपी योद्धा: सुरेंद्र गिल, प्रदीप नरवाल, मोहम्मद मसूद करीम, मोहम्मद तागी पेन महली, श्रीकांत जाधव, साहिल, गुलवीर सिंग, अंकित, गौरव कुमार, आशिष नागर, नितेश कुमार, सुमित, आशु सिंग, नितीन पनवार, गुरदीप.

दबंग दिल्ली: नवीन कुमार, नीरज नरवाल, इमाद सेदाघाट निया, अजय ठाकूर, सुशांत सेल, मोहित, सुमित, मोहम्मद मलक, जोगिंदर सिंग नरवाल, जीवा कुमार, विकास, विजय, बलराम, संदीप नरवाल, मनजीत चिल्लर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंगळुरू बुल्स: पवन कुमार सेहरावत, बंटी, डोंग जिओन ली, अबोलफजल मगसोदलौ महली, चंद्रन रणजीत, जीबी मोरे, दीपक नरवाल, अमित शेओरान, सौरभ नंदल, मोहित सेहरावत, झियाउर रहमान, महेंद्र सिंग, मयूर जगन्नाथ कदम, विकास, अंकी.