यू मुंबा संघाला रोखत गुणतालिकेत आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये घरच्या मैदानावर विजयी घोडदौड कायम राखली. गुणतालिकेत पिछाडीवर पडलेल्या तेलुगू टायटन्स संघाने अटीतटीच्या लढतीत पाटणा पायरेट्सवर ३२-२९ असा विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या.
जयपूरने गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या पुणेरी पलटणला ३३-२७ असे नमवत वर्चस्व गाजवले. जयपूरतर्फे जसवीर सिंग आणि मनिंदर सिंग यांनी चढायांचे प्रत्येकी ७ गुण पटकावले.
प्रो कबड्डीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस तीव्र होऊ लागली आहे. तेलुगू टायटन्सला आगेकूच करण्यासाठी पाटण्याविरुद्धच्या लढतीत विजय क्रमप्राप्त होता. मध्यंतराला टायटन्सचा संघ १६-१८ असा पिछाडीवर होता, मात्र विश्रांतीनंतर लगेचच या पिछाडीचे २४-२० अशा आघाडीत रुपांतर केले. ही आघाडी सातत्याने वाढवत त्यांनी सरशी साधली. टायटन्सतर्फे राहुल चौधरी आणि सुकेश हेगडे यांनी प्रत्येकी ८ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2014 रोजी प्रकाशित
जयपूर पिंक पँथर्सची घोडदौड
यू मुंबा संघाला रोखत गुणतालिकेत आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये घरच्या मैदानावर विजयी घोडदौड कायम राखली.
First published on: 24-08-2014 at 06:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi league jaipur pink panthers vs delhi dabbangs