दुखापतीतून सावरलेल्या मोनू गोयतच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर यूपी योद्धाने दबंग दिल्लीचा ५०-३३ असा पराभव करून प्रो कबड्डी लीगच्या बाद फेरीतील सहावे स्थान निश्चित केले.
सामन्याच्या पहिल्या सत्रातच यूपी योद्धाने २२-१२ अशी एकतर्फी आघाडी मिळवली. मग दुसऱ्या सत्रातही यूपीने ती टिकवली. मोनूने चढायांचे ११ गुण मिळवले, तर श्रीकांत जाधवने नऊ गुण मिळवत त्याला छान साथ दिली.
दुसऱ्या सामन्यात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजायंट्सला ३९-३३ असे नामोहरम केले. पाटण्याकडून प्रदीप नरवालने चढायांचे १७ गुण मिळवले. गुजरातच्या जी. बी. मोरेने १५ गुण मिळवून छाप पाडली.
आजचे सामने
बंगाल वॉरियर्स वि. पाटणा पायरेट्स
यूपी योद्धा वि. पुणेरी पलटण
वेळ : सायंकाळी ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.