विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकत इतिहास घडवला. या मालिकेत चेतेश्वर पुजाराने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणत भारतीय संघाच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली. मात्र कसोटी क्रिकेट गाजवणारा चेतेश्वर पुजारा वन-डे संघात का खेळत नाही, असा प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना पडलेला असतो. या प्रश्नावर खुद्द चेतेश्वर पुजाराने आपलं मत मांडलं असून, मर्यादित षटकांच्या सामन्यात चांगली कामगिरी करुनही भारतासाठी संधी मिळत नसल्याची खंत पुजाराने बोलून दाखवली.

“जर तुम्ही माझी प्रथम श्रेणी क्रिकेटची कारकीर्द पाहिलीत तर मर्यादीत षटकांच्या सामन्यात मी चांगल्या धावा काढतोय. मागच्या हंगामात मी यॉर्कशायर संघाकडून खेळत असताना, मर्यादीत षटकांच्या सामन्यात 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली. त्यामुळे मी वन-डे क्रिकेटही तितक्याच सफाईदारपणे खेळू शकतो. मला अनेकदा लोकं याबद्दल प्रश्न विचारतात…तेव्हा मी मला संघात पुरेशी संधी मिळत नाही असंच सांगतो. पण सध्या जी परीस्थिती आहे तशी मी स्विकारली आहे”, पुजाराने आपली बाजू मांडली.

अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये अजुनही धोनीच सर्वोत्तम फिनीशर !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

2019 साली होणाऱ्या आयपीएलसाठीही पुजारावर कोणत्याही संघाने बोली लावली नाहीये. परदेश दौऱ्यात पुजाराची फलंदाजी बहरत नाही, या टीकेलाही पुजाराने चांगलच प्रत्युत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 4 कसोटी सामन्यांमध्ये पुजाराने 521 धावा काढत मालिकावीराचा किताब पटकावला. सध्या भारतीय संघ कसोटी सामने खेळणार नाहीये, विश्वचषक संपल्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत भारत विंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळेल, त्यावेळी पुजारा भारतीय संघाकडून पुन्हा एकदा मैदानात उतरेल.

अवश्य वाचा – न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल