IPL 2026 Punjab Kings Retains Players List: आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचा बोलबाला पाहायला मिळाला होता. गेल्या हंगामात या संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या हंगामात पंजाबने श्रेयस अय्यरवर सर्वात मोठी बोली लावून आपल्या संघात घेतलं होतं. तर शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग या दोघांना वगळता सर्वांनाच रिलीज केलं होतं. त्यानंतर लिलावात आरटीएमचा सामना करून अर्शदीप सिंगला पुन्हा एकदा आपल्या संघात घेतलं होतं.

पंजाब किंग्ज संघाला कॅमरून ग्रीन संघात हवा आहे, अशी चर्चा सुरू आहे. पण त्याला संघात घेण्यासाठी ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिसला बाहेर काढलं जाऊ शकतं. माध्यमातील वृत्तानुसार, ग्रीनसाठी चहलची देखील सुट्टी होऊ शकते. चहलला ते लिलावात पुन्हा एकदा खरेदी करू शकतात. पण चहलसारखा अनुभवी गोलंदाज लिलावत आला, तर त्याला पुन्हा मिळवणं मुळीच सोपं नसणार आहे.

आयपीएल रिटेन्शनचे नियम काय सांगतात?

येत्या काही दिवसात आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी मिनी ऑक्शन होणार आहे. त्यासाठी फ्रेंचायझींकडे कोणत्या खेळाडूला संघात कायम ठेवायचं आणि कोणाला बाहेर करायचं यासाठी पर्याय उपलब्ध असतो. मिनी ऑक्शनमध्ये संघांना हवे तितके खेळाडू संघात कायम ठेवता येतात. तर हवे तितके खेळाडू ते रिलीज करू शकतात आणि मिनी ऑक्शनमध्ये पुन्हा एकदा खेळाडू खरेदी करता येतात. प्रत्येक संघात २५ खेळाडू असणं गरजेचं आहे. तर प्रत्येक फ्रँचायझीची पर्सची रक्कम १२० कोटी रूपये इतकी असेल.

पंजाब किंग्ज संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

श्रेयस अय्यर, नेहाल वधेरा, प्रियांश आर्या, प्याला अविनाश, मुशीर खान, हरनूर पन्नू, प्रभसिमरन सिंह, जोश इंग्लिस, विष्णु विनोद, मार्कस स्टॉयनिस,मार्को यान्सन, शशांक सिंह, अजमतुल्ला उमरजाई, हरप्रीत ब्रार, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, जेवियर बार्टलेट

पंजाब किंग्ज संघाने रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी

प्रवीण दुबे, ऐरन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, कुलदीप सेन, काईल जेमिसन