भारताची स्टार बँडमिंटन प्लेअर पी. व्ही. सिंधूने इंडिया ओपन सुपर सीरिजचं विजेतेपद मिळवलं आहे. स्पेनच्या कॅरोलिना मरीनवर तिने २१-१९ २१-१६ असा विजय मिळवला. रिओ आॅलिंपिकच्या फायनलमध्ये सिंधूला हरवणाऱ्या कॅरोलिना मरीनशी तिची पुन्हा एकदा गाठ पडली होती. आॅलिंपिकमध्ये सिंधूचा पराभव करणाऱ्या मरीनला हरवत सिंधूने पराभवाचा वचपा काढला आहे.

या स्पर्धेत तिसरं मानांकन मिळालेल्या सिंधूसमोर मरीनचं मोठं आव्हान होतं. कॅरोलिना मरीन जगातली अव्वल मानांकित खेळाडू आहे. पण आजच्या मॅचमध्ये सिंधूलाच अॅडव्हांटेज होतं. रिओ आॅलिंपिकनंतर आपला खेळ जबरदस्त सुधारणाऱ्या सिंधूला घरच्या प्रेक्षकांनी चांगलीच साथ दिली. सिंधूने मरीनला सरळ गेम्समध्ये नमवण्याची किमया साधली.

मॅचमध्ये सुरूवातीपासूनच सिंधूचं वर्चस्व होतं. मॅचच्या सुरूवातीलाच सिंधूने ६ पाॅईंट्सची आघाडी घेत मजबूत पकड मिळवली. पण आपण जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल का आहोत याची चुणूक दाखवत कॅरोलिना मरीनने ही पिछाडी भरून काढत मॅचमध्ये पुनरागमन केलं. पण सरतेशेवटी पहिला गेम सिंधूच्याच खिशात गेला.

दुसऱ्या गेममध्ये आपला खेळ आणखी उंचावत सिंधूने मरीनवर पाॅईंट्सची आघाडी चांगल्या फरकाने राखली आणि इंडिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं.

सिंधू आणि कॅरोलिना मरीनची याआधी नऊ वेळा गाठ पडली होती यापैकी ५ सामने मरीनने तर ४ सामने सिंधूने जिंकले होते. आजच्या या विजयासोबतच सिंधूने आता कॅरोलिना मरीनसोबत बरोबरी साधली आहे

०७:२७- पी.व्ही सिंधूला इंडिया ओपन सुपर सीरिजचं जेतेपद २१-१९, २१-१६

०७:०३-  पी.व्ही. सिंधूने पहिला गेम २१-१९ ने जिंकला

०६:४० – पी.व्ही सिंधू आणि कॅरोलिना मरीनचा महामुकाबला सुरू