मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग IPL स्पर्धेतील दोन कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोन संघांमधील सामना केवळ मैदानावरच खेळला जात नाही तर मैदानाबाहेर चाहत्यांमध्येही खेळला जातो. जितके आक्रमक वातावर मैदानात असते तितकीच आक्रमता आपल्याला दोन्ही संघांच्या चाहत्यामध्ये अनुभवता येते. दोन्ही संघातील खेळाडू जिंकण्यासाठी जितका जोर लावतात तितकाच जोर चाहते आपल्या आवडत्या संघाचे मनोबल उचावण्यासाठी लावतात. दरम्यान जिंकणाऱ्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला जातो. व हरणाऱ्या संघाच्या इभ्रतीचे वाभाडे काढले जातात. असाच काहीसा प्रसंग मंगळवारी झालेल्या सामन्यानंतर घडला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंगमध्ये झालेल्या Playoffs च्या पहिल्या सामन्यात (Qualifier 1) मुंबईने चेन्नईवर सहा गडी राखुन विजय मिळवला. या विजयासह मुंबई IPL 2019 च्या अंतिम फेरीत पोहोचली. मात्र, या सामन्यात मुंबईने चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभूत केले. त्यामुळे मुंबईकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी मुंबई जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना धोनीच्या चैन्नई सुपरकिंगला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.

एका चाहत्याने तर पिवळे पक्षी कितीही उंच उडाले तरी, निळ्या आकाशाच्या खालीच राहतात असे गमतीशीर ट्विट करून चेन्नई संघाच्या चाहत्यांना चिडवले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंगमध्ये झालेल्या Playoffs च्या पहिल्या सामन्यात (Qualifier 1) मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. चेन्नईला शुक्रवारी अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.