New Zealand vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी विश्वचषक २०२३ चा ३५ वा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाने पहिल्याच षटकापासून दमदार फलंदाजी करण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रच्या बॅटने आज पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडला. रचिन रवींद्र या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या मालिकेत पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना रचिन रवींद्रने १०८ धावांची तुफानी खेळी खेळत भारताचा महान फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे.

रचिनने कोहलीला टाकले मागे –

रचिन रवींद्रने आज पाकिस्तानविरुद्ध जगातील तिसरे शतक झळकावले. त्याने या विश्वचषकात पाचव्यांदा ५०हून अधिक धावा केल्या. रचिनने जवळपास सर्वच संघांविरुद्ध धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याने विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. या विश्वचषकात विराट कोहलीने आतापर्यंत ४४२ धावा केल्या आहेत. त्याचवेळी रचिन रवींद्रने कोहलीला मागे टाकत ५२३ धावा केल्या आहेत. मात्र, रचिनने ८ सामन्यात ५२३ धावा केल्या आहेत, तर कोहलीने केवळ ७ सामने खेळले आहेत.

न्यूझीलंडला संघाला ३६व्या षटकात रचिन रवींद्रच्या रुपाने तिसरा धक्का बसला. रचिन रवींद्र ९४ चेंडूंत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०८ धावा करून बाद झाला. त्याला वसीम ज्युनियरने सौद शकीलकरवी झेलबाद केले. तत्पूर्वी, केन विल्यमसन ९५ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्या झाला भावुक; म्हणाला, “हे पचवायला खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता विराट कोहली तिसऱ्या स्थानावर घसरला –

या खेळीसह रचिन या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉक सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात ५४५ धावा केल्या आहेत. रचिनने पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी करत कोहलीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराट कोहली आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.