दुखापतींच्या ससेमिऱ्यातून बाहेर पडत दमदार पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालला कतार टेनिस स्पर्धेत पहिल्याच लढतीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. दुखापती आणि फॉर्म या दोन्ही आघाडय़ांवर अद्यापही सक्षम नसल्याचे या पराभवाने स्पष्ट झाले आहे. वर्षांतील पहिली ग्रँडस्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा काही दिवसांतच सुरू होत आहे. ३४ वर्षीय मायकेल बेररने नदालवर ६-१, ३-६, ६-४ असा विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील नदालचा हा पहिलाच सामना होता. जागतिक क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूंमध्येही नसलेल्या आणि पात्रता फेरीतून मुख्य फेरीत दाखल झालेल्या बेररचा हा शेवटचा हंगाम आहे. पाठ आणि मनगटाच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या नदालने एक सेट जिंकत पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र तो अपुराच ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2015 रोजी प्रकाशित
पहिल्याच फेरीत नदालला पराभवाचा धक्का
दुखापतींच्या ससेमिऱ्यातून बाहेर पडत दमदार पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालला कतार टेनिस स्पर्धेत पहिल्याच लढतीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.

First published on: 08-01-2015 at 05:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal suffers shock defeat by michael berrer in doha