गुडघ्याच्या गंभीर दुखापतीनंतर परतलेल्या राफेल नदालने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत आगेकूच केली. दुखापतीतून सावरल्यानंतर चौथी स्पर्धा खेळत असलेला नदाल सामन्यासाठी सराव करत होता. त्याचवेळी प्रतिस्पर्धी खेळाडू लिआनाडरे मेयर पाठीच्या दुखण्यामुळे माघार घेत असल्याने नदालने पुढच्या फेरीत आगेकूच केली. ही वाईट बातमी आहे. मेयरसाठी तसेच टेनिसरसिकांसाठी ही निराशेची गोष्ट आहे. दरम्यान इंडियन वेल्सचा परिसर भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ एवढी जाणवली. ‘भूकंपाने मी खूपच घाबरलो. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच भूकंप अनुभवत होतो’ असे नदालने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2013 रोजी प्रकाशित
नदालची आगेकूच
गुडघ्याच्या गंभीर दुखापतीनंतर परतलेल्या राफेल नदालने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत आगेकूच केली. दुखापतीतून सावरल्यानंतर चौथी स्पर्धा खेळत असलेला नदाल सामन्यासाठी सराव करत होता.

First published on: 13-03-2013 at 03:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal winsstep forward in indian wells tennis