भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. प्रियांक पांचाळच्या नेतृत्वाखालील भारत अ संघ दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध ४ दिवसांचा कसोटी सामना खेळत आहे. दक्षिण आफ्रिका अ संघाने पहिला डाव ७ बाद ५०९ धावांवर घोषित केला. भारताकडून फिरकी गोलंदाज राहुल चहर हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. चहरने २८.३ षटकांच्या गोलंदाजीमध्ये १२५ धावांत एक बळी घेतला. या सामन्यात एक वेळ अशी आली, जेव्हा चहरला राग अनावर झाला.

चहरचे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचे पायचीतचे अपील केले. त्याचे अपील पंचांनी फेटाळले, त्यानंतर चहरने पंचांशी वाद झाला. पंचांच्या निर्णयावर चहर नाराज झाला आणि त्याने रागाच्या भरात आपला सनग्लासेस खाली फेकला.

हेही वाचा – IND vs NZ : अजून एक मुंबईकर..! श्रेयस अय्यरचं पदार्पणात कसोटी शतक; याआधी सर्वांच्या लाडक्या हिटमॅननं…

चहरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना दक्षिण आफ्रिका अ संघाच्या १२८व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर घडली. खेळाच्या दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षक फलंदाज सिंथेम्बा क्वेशिले स्ट्राइकवर होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताकडून पहिल्या डावात वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि अर्जन नागासवाला यांनी दोन बळी घेतले, तर भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने एक विकेट घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने ४ बाद ३०८ धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉने ४५ चेंडूत ४८ धावा केल्या तर पांचाळने ९६ धावांचे योगदान दिले. अभिमन्यू ईश्वरनने १०३ धावा केल्या. भारत अ संघ अजूनही २०१ धावांनी मागे आहे.