Rahul Dravid has given the latest update on Shubman Gill’s condition: भारतीय संघ रविवार ८ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी भारतीय चाहत्यांना त्रास देणारी एक बातमी समोर आली होती. त्यानुसार शुबमन गिल हा डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आला. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना खेळू शकणार नाही का, अशीही चर्चा होती. या सर्व अटकळांच्या दरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाने शुक्रवारी याबाबत मोठी अपडेट दिली. त्यांच्या निवेदानाची माहिती क्रिकेट विश्वचषकाच्या वेबसाइटवरून मिळाली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, गिलला डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले असले, तरी तो अद्याप पहिल्या सामन्यातून पूर्णपणे बाहेर झालेला नाही. द्रविडने असेही सांगितले की, बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या काळजीत गुंतलेली आहे. संघाने त्याला अद्याप पूर्णपणे वगळलेले नाही.

Harbhajan Singh wants to see Virat Kohli as RCB captain in the next season of IPL
IPL 2024 : ‘विराटला पुढील हंगामात कर्णधार बनवण्याचा विचार करावा…’, माजी खेळाडूचा आरसीबीला सल्ला
Ramandeep Singh Violation of IPL Code of Conduct,
KKR vs MI : कोलकाताच्या स्टार खेळाडूवर BCCIची मोठी कारवाई, मॅच फीच्या तब्बल ‘इतका’ टक्के ठोठावला दंड
Rilee Rossouw gun shot celebration
PBKS vs RCB : विराट कोहलीने रायली रुसोच्या सेलिब्रेशनची नक्कल करत दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
Harshit Rana Stops Himself from Flying kiss Celebration After Abhishek Porel Wicket
IPL 2024: याला म्हणतात भीती! विकेटचं सेलिब्रेशन करता करता थांबला हर्षित राणा, VIDEO मध्ये पाहा नेमकं घडलं?
Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष

शुबमन गिल पहिला सामना खेळू शकेल का?

याबाबत संपूर्ण माहिती देताना राहुल द्रविड म्हणाला, ‘आज (शुक्रवारी) त्याला बरे वाटत आहे. वैद्यकीय पथक दररोज त्यांची काळजी घेत आहे. अजून जवळपास ३६ तास बाकी आहेत. काय निर्णय घेतला जाऊ शकतो ते नंतर पाहू. मात्र आज त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे. वैद्यकीय पथकाने अद्याप त्याला पूर्णपणे नाकारलेले नाही. आम्ही दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहोत. आता त्यांची प्रकृती कशी आहे ते उद्या पाहू.

हेही वाचा – World Cup 2023, PAK vs NED: मोहम्मद रिझवान आणि सौद शकीलच्या नावावर झाली विशेष कामगिरीची नोंद, ‘या’ खास क्लबमध्ये झाला समावेश

शुबमन गिलच्या जागी कोणाला मिळू शकते संधी?

शुबमन गिल खेळू शकत नसेल, तर त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते. सध्या याची शक्यता कमी आहे. मात्र, गिल खेळला नाही, तर इशान रोहितसोबत सलामी येऊ शकतो. सध्या इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवताना दिसत नव्हता. केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त असून तो विकेटकीपिंग करेल. अशा परिस्थितीत गिल खेळला नाही, तर त्याचा जिवलग मित्र इशान किशनला लॉटरी लागू शकते.

हार्दिक पांड्यालाही दुखापत –

रेव्ह स्पोर्टसच्या माहितीनुसार, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना जखमी झाला. फलंदाजीचा सराव करत असलेल्या हार्दिकच्या बोटावर वेगवान चेंडू लागला आणि त्यानंतर त्याने पुढे फलंदाजी केली नाही. मात्र, दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. खबरदारी म्हणून सराव न करण्याचा निर्णय घेण्यात आला.