भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो. तो आपल्या पत्नीसोबत आणि सहकाऱ्यांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. मात्र, आता त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटसोबत छेडछाड झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे एका जवळच्या व्यक्तीने चहलचे अकाउंट हॅक करून त्याचे पत्नी आणि सहाकाऱ्यांसोबतचे चॅट लिक केले आहे.

अकाउंट हॅक करणाऱ्याने युजवेंद्र चहलच्या खासगी चॅटचा स्क्रीनशॉटही ट्विटरवर शेअर केला आहे. असे असूनही याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. कारण, चहलचे अकाउंट हॅक करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडियाचा अॅडमिन आहे. युझवेंद्र चहल सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा एक भाग आहे.

आयपीएल सुरू असताना युझवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सचे अकाउंट हॅक करून संघातील खेळाडूंना अनेक संदेश पाठवले होते. आता त्याचा बदला राजस्थान रॉयल्सने घेतला आहे. राजस्थान रॉयल्सने चहलची पत्नी धनश्री वर्मा, रोहित शर्मा, एमएस धोनी, जोस बटलर, संजू सॅमसन आणि भारतीय क्रिकेट संघाशी झालेल्या खासगी चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. हिशोब चुकता,’ अशा कॅप्शनखाली राजस्थान रॉयल्सने चहलच्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. चहलने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्सला उत्तर दिले आहे. त्याने ट्विटरवर राजस्थान रॉयल्सला प्रत्युत्तर देत लिहिले की, “कभी घी के चाँटे खाये है अॅडमिन?’ शिवाय त्याने आपली ही पोस्ट रोहित शर्मा, एमएस धोनी, जोस बटलर आणि संजू सॅमसनसह यांनाही टॅग केली आहे.