कोलकाता खुल्या टेनिस स्पध्रेत रामकुमार रामनाथ याच्या पराभवानंतर भारताचे आव्हान संपुष्टात आले आह़े़   रामकुमार याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत  टी चेन याला विजयासाठी चांगलेच झुंजवल़े २० वर्षीय या तामिळनाडूच्या खेळाडूने आक्रमक खेळ केला, परंतु बॅकहॅंड मारण्यातील त्याच्या त्रुटींमुळे  चीनच्या चेनने बाजी मारली़   चेन याने दोन तास ४४ मिनिट चाललेली  लढत ६-४, ३-६, ७-६ (५) अशा  फरकाने जिंकली़ पुढील फेरीत चेन मोल्डोवाच्या सहाव्या मानांकित रॅडू अ‍ॅल्बोट याच्याशी भिडेल़ अ‍ॅल्बोटने दुसऱ्या मानांकित अ‍ॅलेक्झ्ॉंडर कुड्रातेसेवचा ७-६ (५), ६-३ असा पराभव केला़