ब्रम्हा-विष्णू-महेश संघाच्या वतीने आयोजित निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने मुंबईच्या अमर हिंद मंडळावर १४ गुणांनी विजय मिळवित विजयी सलामी दिली.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे हिने मध्यंतराआधी सुरेख चढाया करून राजमाता जिजाऊ संघाला ७ गुणांची आघाडी मिळवून दिली होती. याच आघाडीच्या जोरावर राजमाताने विजय मिळवला.
पुरुष गटात, रायगडच्या सोनार सिद्ध संघाने मुंबईच्या अमर हिंद मंडळावर १२ गुणांनी मात केली. नंदुरबारच्या एनटीपी संघाने पुण्याच्या राणाप्रताप संघावर २७-२३ अशी मात केली. अन्य सामन्यात, पुण्याच्या सतेज संघाने इचलकरंजीच्या जयिहद संघावर ३५-१४ असा एकतर्फी विजय मिळविला. महिला गटात पुण्यातील शिवमुद्रा स्पोर्ट्सने ज्ञानप्रबोधिनी संघाचा ३०-१७ असा धुव्वा उडवला. पूजा शेलार हिने केलेल्या सर्वोत्तम चढायांमुळे शिवमुद्रा स्पोर्ट्सने मध्यंतरापर्यंत १७ गुण मिळवले होते. मुंबईच्या डॉ. शिरोडकर स्पोटर्सने मुंबई उपनगरच्या सावित्रीबाई फुले संघावर ३ गुणांनी निसटची विजय मिळविला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2013 रोजी प्रकाशित
राजमाता संघ विजयी
ब्रम्हा-विष्णू-महेश संघाच्या वतीने आयोजित निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने मुंबईच्या अमर हिंद मंडळावर १४ गुणांनी विजय मिळवित विजयी सलामी दिली.
First published on: 13-04-2013 at 04:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajmata team won