२४ फेब्रुवारीपासून पुण्यात

रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचे बाद फेरीचे सामने ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, अंतिम फेरीचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या यजमानपदाखाली पुण्यात होणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीचे सामने विशाखापट्टणम्, वलसाड, मुंबई आणि बंगळुरू येथे होणार आहेत, तर उपांत्य सामने बडोदा आणि कटक येथे होणार आहेत, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पत्रकाद्वारे दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाखापट्टणम्ला विदर्भ-सौराष्ट्र, वलसाडला आसाम-पंजाब, ब्रेबॉर्नवर बंगाल-मध्य प्रदेश आणि बंगळुरूला झारखंड-मुंबई असे उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत.