रणजी करंडक २०२३-२४चा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे, या सामन्याच्या चौथ्या दिवशी डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना विदर्भाने मुंबईला रोखण्याचा प्रयत्न केला. विस्फोटक फलंदाज करुण नायर आणि विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने चौथ्या दिवशी कडवा प्रतिकार केला. पाहुणा संघ पाच गडी बाद २४८ धावांवर असताना चौथ्या दिवसाचा खेळ संपला. विदर्भाला विजय मिळवायचा असल्यास त्यांना आणखी २९० धावांची आवश्यकता आहे, त्यामुळे मुंबई संघाची सामन्यावर पकड कायम असल्याचे दिसत आहे. मुंबईच्या संघाला २०१५-१६ नंतर ट्रॉफी पटकावण्याची मोठी संधी आहे.

चौथ्या दिवशी फलंदाजी करताना वाडकरच्या संघाने फिरकीपटूंविरुद्ध कडवी झुंज दाखवली. पहिल्या डावात ते केवळ १०५ धावांवर सर्वबाद झाले होते. चौथ्याच दिवशी मुंबई संघासमोर विदर्भचा संघ टिकू शकणार नाही अशी सर्वांनाच अपेक्षा असताना त्यांनी चांगली कामगिरी केली. करुण नायर आणि अक्षय वाडकर यांनी अर्धशतक झळकावले असले तरी संघाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे मुंबई संघाची सामन्यावर पकड कायम असल्याचे दिसत आहे.

Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
IPL 2024: Mumbai Indians vs Rajasthan Royals
IPL 2024 : घरच्या मैदानावर खेळ बहरणार? वानखेडेवर आज मुंबई इंडियन्ससमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान
Big blow to Sunrisers Hyderabad team in IPL 2024
IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू टाचेच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

विदर्भ संघाचे सलामीवीर अथर्व तायडे आणि ध्रुव शोरी यांनी त्यांना ६४ धावांची भागीदारी करून दमदार सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला पण शम्स मुलाणीने तायडेला बाद करून पहिली विकेट मिळवली. तनुष कोटियनने शोरीला बाद करत लगेचच दुसरी विकेट घेतली. अमन मोखाडे आणि यश राठोडला पायचीत करत त्यांना झटपट माघारी धाडले आणि पाहुण्या संघाचे १३३ धावांवर ४ विकेट गमावले होते.

करूण नायर आणि वाडकर या मधल्या फळीतील फलंदाजांनी संघाचा डाव सावरला. मुंबईच्या गोलंदाजीसमोर या दोघांनीही मैदानात आपले पाय घट्ट रोवले आणि अर्धशतके झळकावली. पण मुशीर खानने दिवसाच्या अखेरीस ७४ धावांवर असताना नायरला झेलबाद केले.

मुंबई संघ पुन्हा रणजी ट्ऱॉफी चॅम्पियन बनण्यापासून पाच विकेट्स दूर आहे. तर विदर्भाकडून अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे मैदानावर कायम आहेत.