ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रोहित शर्माला ट्वेन्टी-२० च्या कर्णधारपदावरून काढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे जर रोहित शर्माला हटवण्यात आलं, तर ट्वेन्टी-२० च्या कर्णधारपदाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार यावर तर्क वितर्क लढवण्यात येत आहे.

त्यात आफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खानने यावरती आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राशिद खान हा इंडियन प्रीमियर लिगमध्ये ( आयपीएल ) गुजरात टायटन्स कडून खेळत होता. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरलेल्या गुजरात टायटन्सने कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली बाजी मारली होती. त्यामुळे राशिदने ट्वेन्टी-२० संघासाठी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “भारतात परतल्यानंतर तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी देणार होता का?”,पूर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूने रोहितला फटकारले

राशिद खान म्हणाला की, “हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहे. हार्दिकमध्ये यशस्वी कर्णधार होण्याची इच्छाशक्ती आहे. तो चांगला कर्णधार बनू शकतो. शेवटी यावर निर्णय घेण्याचा अधिकार बीसीसीआयचा आहे. पण, हार्दिक कर्णधार बनल्यावर त्याच्याबरोबर खेळण्यास मी उत्सुक आहे,” असेही राशिद खान याने सांगितलं.

हेही वाचा : आयसीसी अंडर-१९ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; टीम इंडियाची कमान शेफाली वर्माच्या हाती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलिकडे न्यूझीलंड विरोधात झालेल्या सामन्यासाठी भारतीय संघाची कमान हार्दिक पांड्याकडे होती. तर, एकदिवसीय संघाचा कर्णधार शिखर धवन होता. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १-० अशी कामगिरी करत सामना जिंकला होता. त्याता आता पुढील वर्षी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. तोपर्यंत संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच राहण्याची शक्यता आहे. पण, २०२४ साली होणार ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी कर्णधार बदलाच्या हालचालींना सुरूवात झाली आहे.