सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. त्याचबरोबर राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. सध्या या संघात संजू सॅमसनलाही स्थान देण्यात आले आहे. त्याचवेळी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा संजू सॅमसनबाबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते संजूला संधी देण्याबाबत बोलत आहे.

एकदा भारताचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यासाठी खूप पाठिंबा दिला होता. ऑस्ट्रेलियन परिस्थितीत सॅमसनचे फलंदाजीचे कौशल्य भारताला अनुकूल ठरले असते, असे त्याने कबूल केले होते. पण आयपीएलनंतर सॅमसनला संधी मिळाली नाही आणि त्यामुळे तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला.

covisheild death indian girls
कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर जीव गमावलेल्या मुलींचे पालक दाखल करणार गुन्हा, नेमके प्रकरण काय?
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत

टी-२० विश्वचषक २०२२ मधून भारत बाहेर पडल्यानंतर एका आठवड्यानंतर, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर पुन्हा आला आहे. ज्यामध्ये त्यांनी सॅमसनबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाला कडक संदेश दिला आहे.

भारत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. पराभवानंतर काही क्षणांनी, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री स्टार स्पोर्ट्सवर माजी भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांच्याशी संभाषण करत होते. तेव्हाच संतापलेले शास्त्री म्हणाले की, भारताने सॅमसनला अनेक संधी देण्याची वेळ आली आहे. व्यवस्थापनाला त्याला सलग १० सामने खेळू द्यावेत. त्यानंतर त्याच्याबाबत निर्णय घ्यावा.

हेही वाचा – Video: ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्या नात्याबद्दल शुबमन गिलने केला महत्वाचा खुलासा; म्हणाला,’ऋषभ ….!’

यादरम्यान, ते म्हणाले, “संजू सॅमसनसारख्या इतर तरुणांना शोधा… त्यांना संधी द्या. त्यांना १० सामने द्या. असे नाही की तो दोन सामने खेळला आणि नंतर बाहेर बसवा. इतर लोकांना बसायला लावा. परंतु त्यांना १० सामने ज्या. मग १० सामन्यांनंतर पाहा, त्यांना अधिक संधी द्यायची की नाही.”

यापूर्वी सॅमसनची आशिया चषक किंवा टी-२० विश्वचषकासाठी निवड झाली नव्हती, परंतु न्यूझीलंड टी-२० मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. वेलिंग्टनमध्ये पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. त्याचबरोबर दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याला संघात स्थान मिळालेले नाही.