Ravichandran Ashwin statement impact player and right to match rule : ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा आयपीएलमधील धोरणात्मक नियम आहे आणि तो रद्द केल्यास त्याची आवडही संपेल, असे मत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले. त्याचबरोबर आर अश्विनने ‘राईट टू मॅच’बाबतही आपले मत मांडले. आयपीएल २०२४ दरम्यान, भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मासह खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून इम्पॅक्ट प्लेयर नियमावर बरीच टीका झाली आहे. मात्र, अश्विनचे ​​मत इतरांपेक्षा वेगळे आहे.

क्रिस श्रीकांतच्या यूट्यूब शो ‘चीकी चीका’ वर बोलताना अश्विन म्हणाला, ‘इम्पॅक्ट प्लेयर नियम इतका वाईट नाही कारण तो क्रिकेटमधील रणनीतीसारख्या घटकांवर अधिक भर देतो. मात्र, याची एक बाजू अशी आहे की, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना प्रोत्साहन तर मिळत नाहीच, पण असे करण्यापासून कोणीही रोखत नाही. ही पिढी अशी आहे की कोणत्याही फलंदाजाला गोलंदाजी करायची नाही. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंना इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा फटका बसला आहे असे नाही. जरा व्यंकटेश अय्यरकडे पहा, तो काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरसाठी आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे क्रिकेटमध्ये नवीन प्रयोग करण्याची संधी मिळते.’

Future medical directives
रुग्णशय्येवरील उपचारांबाबत इच्छापत्रानुसार निर्णय
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
Borderline Personality Disorder BPD among youth
स्वभाव, विभाव : एकाकीपणातली असुरक्षितता
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण
child pornography supreme court new decision
चाइल्ड पोर्नोग्राफीच्या विरोधात सुप्रीम कोर्टानं कायदा कसा मजबूत केला?
Improved Energy Levels doctor suggest some hacks
Improved Energy Levels : ऊर्जा, तणाव, झोप ‘या’ गोष्टींवर नियंत्रण कसं ठेवाल? फक्त हे तीन उपाय करा; समजून घ्या डॉक्टरांचा सल्ला…
Drunk Man Pets Cobra Leaves Internet Stunned Viral
“बाईsss….हा काय प्रकार?” दारुच्या नशेत व्यक्तीने थेट सापाबरोबर घेतला पंगा, पुढे काय घडले ते Viral Videoमध्ये पाहा
chatusutra article on constitution of india marathi news
चतु:सूत्र : जगण्याचा अधिकार!

आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर दोनचे दिले उदाहरण –

यंदाच्या आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर दोनचे उदाहरण देताना अश्विन म्हणाला, ‘सनरायझर्स हैदराबादने शाहबाज अहमदला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी दिली आणि त्याने तीन विकेट्स घेत सामन्याचे चित्र पालटले. आयपीएलमध्ये, जेव्हा दव प्रबळ भूमिका बजावते आणि सामना जवळजवळ एकतर्फी होतो, तेव्हा इम्पॅक्ट प्लेयर सारखा नियम गोलंदाजीचा दुसरा पर्याय आणि खेळाला समतोल प्रदान करतो. जेव्हा तुम्ही अतिरिक्त खेळाडू खेळवता तेव्हा सामना अधिक रोमांचक होतो.

हेही वाचा – Shreyas Iyer : बुची बाबू स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या ‘बॉलिंग ॲक्शन’मध्ये दिसली सुनील नरेनची झलक, VIDEO होतोय व्हायरल

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अनेक खेळाडू उदयास आले –

अश्विन म्हणाला की, या नियमामुळेच शाहबाज अहमद, शिवम दुबे आणि ध्रुव जुरेलसारखे खेळाडू उदयास आले आणि त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले. तो म्हणाला की हा नियम नसता तर जुरेललसारख्या खेळाडूला संधी मिळाली नसती. या नियमामुळेच नवीन खेळाडूंना संघात स्थान मिळत आहे.

हेही वाचा – Jay Shah ICC New Chairman : जय शाह ICC चे पाचवे भारतीय अध्यक्ष, जाणून घ्या याआधी कोणी सांभाळलीय जबाबदारी?

‘राईट टू मॅच’वरही दिली प्रतिक्रिया –

या वर्षी होणाऱ्या मेगा ॲक्शनमध्ये ‘राईट टू मॅच’ हा पर्याय नसावा, असेही अश्विन म्हणाला. तो म्हणाला, ‘जर कोणत्याही फ्रँचायझीला वाटत असेल की एखादा खेळाडू त्यांच्या पहिल्या चार किंवा पाचमध्ये कायम ठेवण्यासाठी पात्र नाही, तर लिलावादरम्यान त्यांना तो खेळाडू खरेदी केल्यानंतर अचानक माघारी घेण्याचा अधिकार नसावा. राईट टू मॅचचा प्रयोग खेळाडूंवर करायचा का नाही, हा निर्णय घेण्याचा अधिकार खेळाडूंना देण्यात यावा.’