India vs England 5th Test: रवींद्र जडेजाने संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजीत त्याला हवी तशी कामगिरी कामगिरी करता आलेली नाही. पण फलंदाजीत त्याचा दरारा पाहायला मिळाला आहे. या मालिकेतील पाचही सामन्यात त्याने फलंदाजीत दमदार कामगिरी केली. यासह त्याने या मालिकेत ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. रवींद्र जडेजाने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
इंग्लंडमध्ये खेळताना ५०० धावा
रवींद्र जडेजा हा वर्तमान भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज पडली, तेव्हा जडेजा खंबीरपणे उभा राहिला. पहिला कसोटी सामना सोडला तर उर्वरित चारही सामन्यांमध्ये जडेजाने अर्धशतकं झळकावली आहेत. या मालिकेतील १० डावात त्याने ५ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात ११ आणि नाबाद २५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने ८९,६९ धावांची खेळी केली होती. तर तिसऱ्या सामन्यात त्याने ७२ आणि ६१ धावा केल्या होत्या. मालिकेतील चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात तो २० धावांवर माघारी परतला होता. तर दुसऱ्या डावात त्याने नाबाद १०७ धावांची खेळी केली होती.
या खेळीच्या बळावर त्याने त्याने चौथा सामना ड्रॉ करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात ९ आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने ५२ धावांची खेळी केली. यासह तो एकाच कसोटी मालिकेत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५०० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान
या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वालने दमदार ११८ धावांची खेळी केली. तर आकाशदीपने ६६ धावांची खेळी केली. तर शेवटी रवींद्र जडेजाने ५३ आणि वॉशिंग्टन सुंदरने ५३ धावा करत ३९६ धावांचा डोंगर उभारला. यासह भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे.