सुरेश रैनाच्या मी पण ब्राह्मणच्या वक्तव्यानंतर रवींद्र जडेजाचे ट्विट; चाहत्यांनी केलं ट्रोल

सुरेश रैनाने टीएनपीएलच्या सामन्यात समालोचनादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी ब्राम्हण असल्याचे म्हटले होते. ज्यामुळे बरीच खळबळ उडाली होती

Ravindra jadeja tweeted rajput boy forever after suresh raina main bhi Brahmin hoon controversy
रविंद्र जडेजाचे हे ट्विट त्याच्या चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही

भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने तामिळनाडू प्रीमियर लीगच्या (टीएनपीएल) पाचव्या मोसमातील सामन्यात समालोचन करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. समालोचनादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना रैना असं काही म्हटला की ज्यामुळे बरीच खळबळ उडाली. रैनाने म्हटले होते की तो ब्राम्हण आहे आणि म्हणूनच त्याला चेन्नईची संस्कृती अवलंबण्यात फारशी अडचण आली नाही. यानंतर रैना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाला होती. रैनानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) टीममधील रवींद्र जडेजाने असे ट्विट केले आहे, त्यानंतर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे.

रवींद्र जडेजा याने त्याच्या अधिकृत ट्विटरवर लिहिले की, ‘सदैव राजपूत मुलगा, जय हिंद.’ जडेजाचे हे ट्विट चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही. जडेजाकडून अशा ट्वीटची अपेक्षा नसल्याचे चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे. काही लोकांनी म्हटले आहे की अशा खेळात जातीवाद पसरवणे अजिबात योग्य नाही. रैनाच्या वक्तव्यानंतरही त्याच्या चाहत्यांना त्याने स्वत: ला ब्राह्मण म्हणणे, नेटकऱ्यांना आवडले नाही. एका यूझरने लिहिले होते, की सुरेश रैना, तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे. तू इतकी वर्षे खेळूनही चेन्नईची खरी संस्कृती कधी अनुभवली नाहीस.

सुरेश रैनानं स्वत: ला म्हटलं ‘ब्राह्मण’; भडकलेले नेटकरी म्हणाले, “तुला लाज…”

रवींद्र जडेजाच्या ट्विटनंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

जडेजा सध्या इंग्लंडमध्ये आहे. ४ ऑगस्टपासून भारताला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि कौंटी सिलेक्ट इलेव्हन यांच्यात तीन दिवसीय सराव सामना खेळला गेला. हा सराव सामना अनिर्णित राहिला, परंतु रवींद्र जडेजाने या सामन्यात फलंदाजीसह शानदार प्रदर्शन केले. जडेजाने दोन्ही डावात अनुक्रमे ७५ आणि ५१ धावा केल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ravindra jadeja tweeted rajput boy forever after suresh raina main bhi brahmin hoon controversy abn